Nagpur News : विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने काँग्रेसने विभागनिहाय बैठका आटोपल्यानंतर आता जिल्हास्तरीय मेळावे घेण्यात येत आहेत. शहर व जिल्हाध्यक्षांना संभाव्य उमेदवारांची यादी सादर करण्यास सांगण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून काँग्रेसचे (Congress) उमेदवार जवळपास निश्चित होणार असल्याचे संकेत देण्यात येत आहे.
मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके, माजी मंत्री अनिस अहमद, अतुल कोटेचा, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष नंदा पराते यांच्यात चढाओढ सुरू आहे.
नागपूर जिल्ह्याचा मेळावा रविवारी (ता.22) गंजीपेठ येथील रजवाडा पॅलेस येथे सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निखाला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार, काँग्रेस कमेटीचे सचिव कुणाल चौधरी, माजी मंत्री आमदार नितीन राऊत, आमदार अभिजित वंजारी, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री अनिस अहमद यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन नागपूर शहर अध्यक्ष, आमदार विकास ठाकरे यांनी केले आहे.
आमदार विकास ठाकरे आणि नितीन राऊत आमदार असल्याने पश्चिम आणि उत्तर नागपूरचे उमेदवार ठरलेच आहे. दक्षिण, पूर्व, मध्य आणि दक्षिण-पश्चिम या विधानसभेसाठी काँग्रेसला उमेदवार ठरवायचे आहे. दक्षिण-पश्चिमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल गुडधे यांची उमेदवारीसुद्धा निश्चित मानली जात आहे.
सर्वाधिक चुरस दक्षिण, पूर्व आणि त्या पाठोपाठ मध्य नागपूरमध्ये आहे. दक्षिणमध्ये गिरीश पांडव यांच्यासह काँग्रेसच्या सोशल मीडियाचे प्रदेश अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांची दावेदारी केली आहे. पूर्वमध्ये संगीता तलमले यांचे नाव आघाडीवर आहेत. त्यांच्याशिवाय पुरुषोत्तम हजारे, संजय महाकाळकर, उमाकांत अग्निहोत्री यांची नावे चर्चेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.