Hasan Mushrif Nandurbar drought news : दुष्काळाचे सावट, मात्र पालकमंत्री मुश्रीफ गोकुळच्या निवडणुकीत व्यस्त; ठाकरेंच्या शिवसेनेने थोपटले दंड

Hasan Mushrif Nandurbar drought news : नंदुरबारमध्ये कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पीक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी सरसकट नुकसानभरपाईची मागणी करत आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही टीका होत आहे.
Hasan mushrif
Hasan mushrifSarkarnama
Published on: 
Updated on: 

नंदुरबार जिल्हातील सर्व ६ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. पावसाअभावी शेतीचे नुकसान होत असताना शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. मात्र, पालकमंत्री हसन मुश्रीफ हे जिल्हाप्रमुख दुष्काळी परिस्थितीकडे दुर्लक्ष करून गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत व्यस्त असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नंदुरबारचे जिल्हाप्रमुख पंडित माळी यांनी केला आहे.

नंदुरबारमध्ये दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत असताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्ह्याचा दौरा करावा, अशी मागणी होत आहे. पालकमंत्री जिल्ह्यात फिरकलेच नसल्याचा आरोप करत पंडित माळी यांनी त्यांच्या पालकमंत्रीपदाचा जिल्ह्याला नेमका काय फायदा झाला, असा सवाल उपस्थित केला.

Hasan mushrif
Congress news : महाराष्ट्रातील काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांमधील राजकीय भांडण मिटलं; दिल्लीतून आलेल्या नेत्यांसमोरच नाव घेत केलं जाहीर...

दुष्काळामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा दावा करत शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी माळी यांनी केली आहे. शासनाने पंचनामे, मदत आणि नुकसान भरपाईबाबत तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने तत्काळ भूमिका घेतली नाही तर नंदुरबार जिल्हात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे. सरसकट नुकसान भरपाई न मिळाल्यास जिल्हात पालकमंत्री, आमदार आणि खासदारांना फिरु देणार नाही, असा इशाराही पंडित माळी यांनी दिला आहे.

Hasan mushrif
Pune FDA : पुण्यात कारवाईसाठी सांगलीचे पथक; FDA मधील ‘झारीतील शुक्राचार्य’ कोण? मुंडेंच्या रडारवर 12 अधिकारी

नंदुरबारमधील दुष्काळ, शेतकऱ्यांचे नुकसान, नुकसान भरपाई आणि पालकमंत्र्यांची भूमिका यावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी कोणती मदत जाहीर केली जाते, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com