Pune FDA : पुण्यात कारवाईसाठी सांगलीचे पथक; FDA मधील ‘झारीतील शुक्राचार्य’ कोण? मुंडेंच्या रडारवर 12 अधिकारी

FDA Maharashtra 12 officers under scrutiny : स्थानिक पथकाला दूर ठेवून सांगलीच्या FDA टीमकडून पुण्यात कारवाई करण्यात आली. FDA विभागात नेमकं काय सुरू आहे? 12 अधिकारी चर्चेत का आले?
Tukaram Mundhe
Tukaram MundheSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : राज्यभरातील अन्नभेसळखोरांविरोधात धडक कारवाईचा सपाटा लावलेल्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आता विभागातीलच अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे मोर्चा वळविल्याची चर्चा आहे. मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, अकोला आणि बुलढाणा येथील १२ अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबन आणि विभागीय चौकशीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामध्ये पुण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मुंडे यांनी २५ मे रोजी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अन्नभेसळीविरोधातील कारवायांना वेग दिला. ऑगस्टपर्यंत राज्यात १२ हजार ८३ तपासण्या, ५ हजार २६९ सुधारणा नोटिसा आणि ६०३ परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुणे विभागातही कारवाईचा वेग वाढला असून अवघ्या २१ दिवसांत ८४९ आस्थापनांची तपासणी करण्यात आल्याचे विभागीय आकडेवारीतून समोर आले. मात्र या कारवाईच्या धडाक्याबरोबरच पुण्यात काही प्रकरणांबाबत वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत.

Tukaram Mundhe
Thane Crime News : कार्यालयात पक्षाच्या कामात मग्न असतानाच धाडधाड सात राऊंड फायरिंग..! प्रदीप पुर्णेकरांच्या हत्येचा थरारक घटनाक्रम, काय घडलं त्या रात्री?

स्थानिक पथकाला डावलून सांगलीच्या पथकाची धाड

गणेशोत्सवाच्या काळात पुण्यातील बुधवारपेठ परिसरात संशयित पनीर आणि खव्याच्या दोन ट्रकवर कारवाई करण्यात आली. कर्नाटकातून आलेले पनीर आणि बारामती परिसरातून आलेला खवा असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, या कारवाईसाठी पुण्यातील स्थानिक पथकाऐवजी सांगली येथील पथकाला पुण्यात आणण्यात आल्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्थानिक यंत्रणेची माहिती न घेता दुसऱ्या जिल्ह्यातील पथकाकडून कारवाई करण्याची गरज का भासली? स्थानिक अधिकाऱ्यांवर वरिष्ठांचा विश्वास उरला नाही का? अशा चर्चा आता सुरू झाली आहे.

काही प्रकरणांबाबत प्रश्नचिन्ह

दरम्यान, पुण्यातील एका प्रसिद्ध वडापाव व्यावसायिकावरील कारवाई, सोनई डेअरी आणि गोवर्धन दूध डेअरीशी संबंधित कारवाई प्रकरणांबाबतही विविध चर्चा सुरू आहेत. काही प्रकरणांमध्ये कारवाईपूर्वीच तडजोड झाल्याची चर्चा अधिकारी आणि व्यावसायिकांच्या वर्तुळात होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणांमध्ये नेमकी काय कारवाई झाली, नमुने घेण्यात आले का, अहवाल काय आला आणि पुढे कोणती कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली, याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाने स्पष्टता देणे अपेक्षित आहे मात्र तसं झालं नसल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंडे यांनी विभागातील काही प्रकरणांची स्वतंत्र माहिती आणि अहवाल मागविल्याची चर्चा आहे.

12 अधिकारी मुंडेंच्या रडारवर?

दरम्यान, fda विभागातील काही अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत गंभीर आक्षेप नोंदविण्यात आल्याची माहिती आहे. मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, अकोला आणि बुलढाणा येथील १२ अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबन तसेच विभागीय चौकशीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Tukaram Mundhe
Congress news : काँग्रेसमधील अंतर्गत कलहाचा पहिला बळी ; खासदाराने सोडलं महत्वाचं पद, पक्षाला धक्का

'झारीतील शुक्राचार्य’ कोण?

भेसळखोरांविरोधात बाहेर कारवाई सुरू असताना विभागाच्या आतूनच कारवाईची माहिती लीक होत असेल किंवा काही प्रकरणांच्या फाइल्स रखडत असतील, तर त्याची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान FDA प्रशासनासमोर आहे.

पुण्यातील कारवाईसाठी स्थानिक पथकाऐवजी सांगलीच्या पथकाला पाचारण करण्याच्या घटनेने या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे. त्यामुळे FDAमध्ये नेमके कुणावर विश्वास ठेवायचा, काही प्रकरणे प्रलंबित का राहिली आणि त्यामागे कोणाची भूमिका होती, याचा शोध आयुक्त तुकाराम मुंडे घेणार का, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com