Pratibha Dhanorkar News : 'काँग्रेसच्या पक्षांतर्गत विरोधामुळेच नवऱ्याचा जीव गेला' ; प्रतिभा धानोरकरांचा खळबळजनक आरोप!

Chandrapur Congress News : 'ही मंडळी माझ्याही मागे लागली आहेत, पण आता दुसरा जीव...' असंही म्हणाल्या आहेत.
Balu Dhanorkar and Pratibha Dhanorkar
Balu Dhanorkar and Pratibha DhanorkarSarkarnama

Chandrapur Lok Sabha Constituency News : लोकसभा निवडणुकीवरून आता राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात तर उमेदवारीसाठी इच्छुक असणारे चंद्रपूर ते दिल्ली असा प्रवास करत आहेत. अशात काँग्रेसच्या आमदार तथा लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या प्रमुख दावेदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

'काँग्रेसच्या पक्षातंर्गत विरोधामुळेच माझे खासदार पती बाळू धानोरकर यांचा जीव गेला.ही मंडळी माझ्याही मागे लागली आहे.पण आता दुसरा जीव जाऊ देणार नाही.' असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. तसेच भाजपने काँग्रेसमध्ये काही माणसे पे रोल वर ठेवली आहेत, असा आरोपही आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात(Chandrapur Lok Sabha Constituency) काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी आमदार प्रतिभा धानोरकर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्यात कमालीची रस्सीखेच सुरू आहे. आमदार प्रतिभा धानोरकर यांचे पती बाळू धानोरकर यांनी मागील निवडणुकीत भाजपचे दिग्गज नेते हंसराज अहिर यांचा पराभव केला होता.

दरम्यान आठ महिन्यापुर्वी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आमदार प्रतिभा धानोरकर यांनी अतिशय ताकदीने आपल्या कामांना गती दिली. यावेळी होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कुठल्याही स्थितीत आपणास काँग्रेसची उमेदवारी मिळेल असा त्यांना विश्वास आहे. पक्षाकडे त्यांनी रीतसर उमेदवारीही मागितली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Balu Dhanorkar and Pratibha Dhanorkar
Amravati Tension : कमानीच्या वादावरून अमरावतीत तणाव; पोलिसांचा लाठीमार

दरम्यान पंधरा दिवसाआधी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay wadettiwar) यांनी पक्षाने संधी दिल्यास आपण चंद्रपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे म्हटले होते. यानंतर त्यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा नुसती बोलून दाखविली नाही तर त्या कामाला लागल्या आहेत. चंद्रपुरातील अनेक मान्यवरांच्या भेटी घेत त्यांनी वातावरण निर्मिती केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी दिल्ली येथे जात महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांची भेट घेतली आहे.

दरम्यान आता प्रतिभा धानोरकर(Pratibha Dhanorkar) यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही. तर त्या भाजपमध्ये प्रवेश घेऊन लोकसभा निवडणूक लढवतील असा संदेश पसरविण्यात येत आहे. या मुद्द्यावरून आता प्रतिभा धानोरकर आक्रमक झाल्या. त्यांनी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत विरोधाधामुळे आपल्या पतीचा जीव गेल्याचा खळबळजनक आरोप केला. ही मंडळी आता आपल्या मागे लागली आहे. पण आता दुसरा जीव मी घेऊ देणार नाही. अस त्या म्हणाल्या आहेत.

Balu Dhanorkar and Pratibha Dhanorkar
Lok Sabha Election 2024 : वंचित बहुजन आघाडीचा आता काँग्रेसकडे ‘हात’

आपण कुठल्याही स्थितीत काँग्रेस सोडणार नसून मी काँग्रेसच्या खासदाराची बायको असून मी काँग्रेसच्या तिकीटावरच लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. शिवानी वडेट्टीवार ही आपली प्रतिस्पर्धी होऊच शकत नाही. शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला गेल्याने पक्षाची उमेदवारी मिळत नसते. असे सांगत धानोरकर यांनी शिवानी वडेट्टीवारांवर जोरदार टीकास्त्र सोडले. उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये सुरू झालेले वादविवाद आता चांगलेच पेटले असल्याचे चित्र आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com