Dollar at 100 Rupees : डॉलर 100 रुपयांवर गेला, तर मोदींचा जाहीर सत्कार करणार; माजी राज्यमंत्र्यांचे उपरोधिक पत्र चर्चेत

Subodh Savji targets PM Narendra Modi over falling rupee and rising dollar amid economic crisis : रुपयाच्या घसरणीवरून केंद्रावर निशाणा साधत, डाॅलर समोर 100 रुपये झाल्यावर पंतप्रधानांचा जाहीर सत्कार करणार असल्याचं पत्र सुबोध सावजी यांनी पाठवलं आहे.
Dollar at 100 Rupees
Dollar at 100 RupeesSarkarnama
Published on
Updated on

Subodh Savji letter to Modi : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती, जागतिक आर्थिक अस्थिरता आणि वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाल्याचे चित्र आहे.

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण कायम असून, देशातील अनेक भागांत इंधन टंचाईची समस्या देखील गंभीर बनत चालली आहे. पेट्रोल-डिझेलसाठी शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक रांगेत उभे असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर बुलढाणा इथले माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना एक उपरोधिक पत्र लिहून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. “ज्या दिवशी एका अमेरिकन डॉलरची किंमत 100 रुपये होईल, त्या दिवशी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जाहीर सत्कार करू,” अशी घोषणा सावजी यांनी केली आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात एका अमेरिकन डॉलरचा दर सुमारे 95.85 ते 96.20 रुपयांच्या दरम्यान पोहोचला आहे. अमेरिकन डॉलरची जागतिक मजबुती, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि भू-राजकीय तणावामुळे भारतीय रुपयावर दबाव वाढत असल्याचे आर्थिक (Economy) तज्ज्ञांचे मत आहे.

Dollar at 100 Rupees
Balasaheb Thorat : काँग्रेसमध्ये ‘थोरात पॅटर्न’ अ‍ॅक्टिव्ह! तीन अध्यक्षांची घोषणा; 'स्थानिक'पूर्वी मोठी रणनीती

सुबोध सावजी यांनी पत्रात केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. “भारताच्या इतिहासात ज्या दिवशी एका डॉलरची किंमत 100 रुपये होईल, तो दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा असेल,” असा उपरोधिक उल्लेख त्यांनी केला.

Dollar at 100 Rupees
SSC Copy Case : दहावीच्या परीक्षेत ‘कोकण पॅटर्न’चा धक्कादायक प्रकार! एका विद्यार्थ्याच्या सातही पेपरच्या पुरवण्या दुसऱ्यानेच लिहिल्या

त्यांनी पुढे म्हटले आहे की, “गेल्या 70 वर्षांत काँग्रेसला जे जमले नाही, तो बहुमान आता आपल्या नेतृत्वाखाली देशाला मिळणार आहे. जातीयवाद, धर्मवाद आणि जुमलेबाजीच्या जोरावर सरकारे स्थापन होत असताना सर्वसामान्य जनता मात्र महागाई आणि आर्थिक संकटाने त्रस्त झाली आहे.”

सावजी यांनी पत्रात आणखी एक पाऊल पुढे टाकत, “एका डॉलरची किंमत 100 रुपये झाल्यानंतर आपण आम्हाला वेळ आणि तारीख द्यावी. आम्ही दिल्लीमध्ये आपल्या पदाला साजेशा पद्धतीने स्वखर्चाने भव्य सत्कार करू,” असेही नमूद केले आहे.

रुपयाच्या घसरणीवरून केंद्र सरकारवर विरोधक सातत्याने टीका करत असताना, सुबोध सावजी यांच्या या पत्रामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com