Wajahat Mirza Nana Patole
Wajahat Mirza Nana Patolesarkarnama

Wajahat Mirza : वजाहत मिर्झा यांना पुन्हा संधी की...,नाना पटोले कुठला डाव टाकणार?

Will Congress Nana Patole nominate Wajahat Mirza again : शिवाय मुस्लिम समजााला लोकसभेत प्रतिनिधित्व मिळाले नाही. या मुद्द्यावरून मिर्झा यांनाच परत उमेदवारी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

राजेश चरपे

Nagpur News : विधान परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसचे विधान परिषद सदस्य वजाहत मिर्झा यांचा 6 वर्षांचा कार्यकाळ संपल्याने आता जिल्ह्यातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कोणाला संधी देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोशल इंजिनिअरींग म्हणून पटोलेंनी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिले होते. मात्र, आरटीओ संदर्भात विधान परिषदेत प्रश्न विचारला जाऊ नये म्हणून मिर्झा यांनी पैसे मागितल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला. मिर्झा यांच्या वतीने एक दलाल हे सर्व कारनामे करीत होते असेही तपासाअंती पुढे आले. भाजपने हा मुद्दा फारसा उचलून धरला नव्हता. त्यामुळे मिर्झा फारसे प्रकाशझोतात आले नाही.

हे प्रकरण फारसे प्रकाशात आले नाही. शिवाय मुस्लिम समजााला लोकसभेत प्रतिनिधित्व मिळाले नाही. या मुद्द्यावरून मिर्झा Wajahat Mirza यांनाच परत उमेदवारी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. मात्र, मुस्लिम समाजातील अनेक ॲक्टिव्ह कार्यकर्ते सध्या स्पर्धेत आहेत. त्यामुळे मिर्झा या स्पर्धकांना कसे समोरे जातात हे पाहावे लागेल.

2018 मध्ये विधानसभेच्या सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या जागासाठी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत पुसद येथील दोघांना संधी मिळाली. भारतीय जनता पक्षाकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. नीलय नाईक तर काँग्रेसकडून Congress डॉ. वझाहत मिर्झा विधान परिषदेवर निवडून गेले होते.

महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत होत आहे. पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर जातीय समीकरणे देखील बललली आहेत. त्यामुळे जातीय धार्मिक समीकरणे सांभाळण्यासाठी विधान परिषदेवर कोणाल संधी मिळणार याची देखील उत्सुकता असणार आहे.

Wajahat Mirza Nana Patole
Niranjan Davkhare Vs Abhijit Panse: मनसेशी फिसकटलं? भाजपच्या डावखरेंचं ठरलं, अभिजीत पानसेंविरोधात' या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार

पुसद विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक हे करीत आहेत. विधान परिषदेवर अ‍ॅड. नीलय नाईक तसेच डॉ. वजाहत मिर्झा हे विधान परिषदेचे सदस्य आहे. विधान परिषदेच्या दोन्ही सदस्यांचा कार्यकाळ जुलै महिन्यात पूर्ण होणार आहे. यामुळे पुसद सोबत जिल्ह्यातील दोन आमदारांची संख्या कमी होणार आहे. नवीन सदस्य निवडताना कुणाला संधी मिळणार याचीच चर्चा रंगू लागली आहे.

(Edited By Roshan More)

Wajahat Mirza Nana Patole
Lok Sabha Election 2024 : पोलिसांच्या 'या' आदेशामुळे विजयानंतरही कार्यकर्त्यांचा हिरमोड होणार; कारण काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com