Nagpur Session News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहित मलिकांना 'महायुती'त घेण्यास नकार दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. आता यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आपले मत व्यक्त केले आहे.
"नवाब मलिक यांच्याबाबत राष्ट्रवादीचा अजित पवार (Ajit Pawar) गट निर्णय घेईल, पण त्यांच्यावर गंभीर आरोप असल्यामुळे निर्दोष मुक्त झाल्याशिवाय त्यांना महायुतीत घेता येणार नाही", असे स्पष्ट मत बावनकुळेंनी व्यक्त केले. नवाब मलिक हे आज अधिवेशनात सत्ताधारी गटाच्या बाजूला सभागृहात बसले होते. याबाबत बावनकुळे यांना पत्रकारांनी छेडले, त्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नवाब मलिक (Nawab Malik) अधिवेशनास उपस्थित राहिले होते. ते सत्ताधारी गटाच्या बाजूला बसले होते. तसेच सभागृहातून बाहेर आल्यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात येऊन बसले होते.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादीला दिलेल्या पत्रानंतरही मलिक राष्ट्रवादीसोबत राहिले आहेत. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला दिलेल्या पत्राबद्दल मी फडणवीस यांचे अभिनंदन करतो. नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप असून, त्यांच्याबाबत राष्ट्रवादीने निर्णय घ्यायचा आहे".
जामीन रद्द व्हावा, यासाठी प्रयत्न करणार का ? या पश्नावर ते म्हणाले, "याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली भाजप निर्णय घेईल, पण महायुतीत घेण्यासाठी त्यांना निर्दोष मुक्त व्हावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात नवाब मलिक यांच्यावरून कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.
(Edited by- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.