Maharashtra Government : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्याची होणार पुनर्रचना : महसूल विभागाकडून सरकारकडे प्रस्ताव सादर

Yavatmal District : यवतमाळ जिल्ह्याच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव महसूल विभागाने शासनाकडे सादर केला आहे. पुसद येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर झाल्याने प्रशासन अधिक सुलभ होणार आहे.
Yavatmal district set for administrative restructuring as Maharashtra government approves new additional collector office at Pusad to improve rural governance access.
Yavatmal district set for administrative restructuring as Maharashtra government approves new additional collector office at Pusad to improve rural governance access.Sarkarnama
Published on
Updated on

Yavatmal District : महाराष्ट्र सरकारने नुकतेच ११ नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये आणि तब्बल 69 अपर तहसील कार्यालये मंजूर केली आहेत. प्रशासकीय कामकाज सुलभ करणे आणि ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हास्तरावरील, तालुकास्तरावरील कामे जवळ उपलब्ध करून देणे, हा यामागील उद्देश होता.

यातीलच एक अपर जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे आणि जिल्ह्यातील पुसदमधील शेंबाळपिंपरी आणि उमरखेडमधील ढाणकी येथे अपर तहसील कार्यालय मंजूर झाले आहे. यामुळे जिल्ह्याच्या महसूल विभागाची नव्याने पुनर्रचना होणार आहे. या पुनर्रचनेचा प्रस्ताव महसूल विभागाने शासनाकडे सादर केला आहे.

यवतमाळ मोठा जिल्हा :

यवतमाळ जिल्ह्यात आजघडीला तब्बल 16 तालुक्यांचा समावेश होतो. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र बरेच मोठे आहे. जिल्हा मुख्यालयापासून अनेक गावांचे अंतर 100 किलोमीटरपेक्षा अधिक आहे. लोकसंख्याही 27 लाखांच्या घरात आहे. हीच भौगोलिक क्षेत्रफळ आणि येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने पुसद येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर केले आहे.

Yavatmal district set for administrative restructuring as Maharashtra government approves new additional collector office at Pusad to improve rural governance access.
Maharashtra Politics Live Update : मुंबई विमानतळावर भीषण आग

नवीन रचना कशी असेल?

या अंतर्गत पुसद आणि उमरखेड हे दोन उपविभाग, पुसद, दिग्रस, उमरखेड आणि महागाव हे चार तालुके, हीच चार तहसील कार्यालये आणि शेंबाळपिंपरी व ढाणकी या नव्याने होणाऱ्या अपर तहसील कार्यालयांचा समावेश होणार आहे. एकूण 8 लाख लोकसंख्या पुसद अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला जोडली जाणार आहे

Yavatmal district set for administrative restructuring as Maharashtra government approves new additional collector office at Pusad to improve rural governance access.
Maharashtra Government : राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर साध्या 'आमदार निवासात' राहण्याची वेळ : मकरंदआबांना 'पुनर्वसनासाठी' शासकीय 'मदतीची' गरज

दोन अपर तहसील कार्यालयांना मंजुरी :

पुसद आणि उमरखेड तहसील कार्यालयाचे विभाजन करून पुसदमधील शेंबाळपिंपरी आणि उमरखेडमधील ढाणकी या दुर्गम म्हणून गणल्या जाणाऱ्या मंडळासाठी अपर तहसील कार्यालय मंजूर झाली आहेत. त्यामुळे चार तहसील कार्यालय आणि दोन अपर तहसील कार्यालय यांचा समावेश पुसद अपर जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com