Eknath Shinde Virat Kohli : लंडनमध्ये विराट कोहलीने घेतली एकनाथ शिंदेंची भेट; पहिल्यांदाच थेट चर्चा...

Virat Kohli meets Eknath Shinde, London : लंडनमध्ये एकनाथ शिंदे आणि विराट कोहली यांच्या भेटीत महाराष्ट्रातील पायाभूत विकास, कल्याणकारी योजना आणि ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’वर चर्चा; कोहलीकडून राज्याच्या प्रगतीचे कौतुक.
Eknath Shinde Virat Kohli meeting
Eknath Shinde Virat Kohli meetingSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde Virat Kohli meeting : लंडनच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची क्रिकेटपटू विराट कोहलीने भेट घेतली. दोघांची यापूर्वीही भेट झाली होती. पण आजच्या भेटीत झालेली थेट चर्चा विशेष असल्याचे शिंदे यांनी सांगितले. भेटीदरम्यान विराटने महाराष्ट्रात अलीकडच्या काळात झालेल्या विकासाचे कौतुकही केल्याचे शिंदे म्हणाले.

वर्ल्ड लीडरशिप फोरमच्या वतीने लंडन येथील संसदेच्या 'हाऊस ऑफ कॉमन्स'मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत शिंदे यांना गुरूवारी ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’ देऊन गौरवण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी विराटने शिंदे यांची भेट घेतली. या भेटीबाबत शिंदे यांनी 'एएनआय'शी बोलताना माहिती दिली.

आपण लंडनमध्ये असल्याचे समजताच विराट आपली सदिच्छा भेट घेण्यासाठी आल्याचे सांगत शिंदे म्हणाले, विराट कोहली जमिनीशी जोडला असल्याचे पाहून मला खूप आनंद झाला. यापूर्वीही आम्ही भेटलो आहोत. पण आजच्या भेटीत झालेली चर्चा विशेष होती. मला मिळालेला पुरस्कार, महाराष्ट्रातील विविध कल्याणकारी योजनांवरही यावेळी चर्चा झाली.

Eknath Shinde Virat Kohli meeting
जावयासाठी बड्या नेत्याचा राजकारणातून संन्यास; पक्षात होता मोठा रुबाब...

पायाभूत सुविधांबाबत माहिती देत असताना विराटने स्वत:हून अलीकडच्या काळात महाराष्ट्रातील अभूतपूर्व विकासाचे कौतुक केल्याचे शिंदेंनी सांगितले. विराटला शिंदेंनी राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प आणि विविध योजनांचीही माहिती दिली. त्यामध्ये नवी मुंबई विमानतळाजवळील 'तिसरी मुंबई'चा विकास, अटल सेतू, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, मेट्रो आदी प्रकल्पांचा समावेश आहे.

शाळा आणि आरोग्य सुविधांसह इतर पायाभूत सुविधांवरही शिंदेंनी विराटला सांगतिले. महाराष्ट्र जीडीपी, स्टार्टअप्स, पायाभूत सुविधा आणि थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर असल्याची माहितीही विराटला दिली. हे ऐकून विराटला खूप आनंद झाल्याचे शिंदेंनी आवर्जून सांगितले. या कामांमुळे लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे त्याने भेटीत मान्य केल्याची माहितीही त्यांनी दिली.

Eknath Shinde Virat Kohli meeting
IAS Dog Walking Controversy : लाडक्या श्वानाला फिरवण्यासाठी स्टेडिअम रिकामे करायला लावले; महिला 'IAS'ला सुप्रीम कोर्टाचा दणका

पायाभूत सुविधा, विकास, लाडकी बहीण योजना, शासन आपल्या दारी हा उपक्रमांबाबत ऐकूनही विरोट भारावून गेला. तरुण पिढीने विविध स्पर्धांमध्ये आपली कामगिरी कशी उंचवावी, अंगभुत गुणांना कसा वाव द्यावा, यावरही शिंदे आणि विराटमध्ये चर्चा झाली. याबाबत विराटने काही चांगल्या कल्पनाही मांडल्याचे शिंदेंनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com