Abhishek Ghosalkar Case : "मॉरिसची आत्महत्या नाही, तर हत्याच," ठाकरेंच्या आमदाराने उडवली खळबळ!

Abhishek Ghosalkar Case : "या दोन्ही हत्यांमागे तिसऱ्या माणसाचा हात?"
Abhishek Ghosalkar Case
Abhishek Ghosalkar Case Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai Crime News : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर मॉरिस नावाच्या व्यक्तिने फेसबुक लाईव्हमध्येच गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र, घोसाळकर यांची हत्या केल्यानंतर मॉरिसनेही स्वत:वर गोळ्या झाडत आत्महत्या केली, अशी माहिती पुढे आली. मात्र मॉरिसच्या मृत्यूसंदर्भात आता ठाकरे गटाच्या आमदाराने खळबळजनक दावा केला आहे. मॉरिसचीही आत्महत्या नाही, तर हत्याचे घडल्याचे सांगत एकच खळबळ उडवून दिली आहे. (Latest Marathi News)

Abhishek Ghosalkar Case
Abhishek Ghosalkar Shot Dead : मॉरिसचे 'ते' प्रकरण भोवले! अभिषेक घोसाळकरांच्या हत्येमागे वेगळाच संशय

अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसची आत्महत्या झाली नाही, तर हत्या करण्यात आली, असेच मला वाटत आहे, असे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले. या दोन्ही हत्यांमागे तिसरा माणसाचाच हात आहे, अशी दाट शंका मला येत आहे, या हत्यामागचा मास्टरमाईंड शोधून काढावा, असे आमदार देशमुख म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Abhishek Ghosalkar Case
Abhishek Ghosalkar Shot Dead : घोसाळकर गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; मॉरिसच्या पीएसह दोन जण ताब्यात

फडणवीसांवर वार -

नितीन देशमुख यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही या अनुषंगाने टीका केली आहे. 'जेव्हा आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेलो, तेव्हा आपला 'गेम' करायचा षडयंत्र फडणवीसांनी रचला होता. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा खळबळ उडवून देणारा आरोप केला आहे. त्यावेळी आपल्याला हृदयविकाराचा झटका आल्याचा बातम्या मुद्दामून पेरल्या गेल्या, असेही देशमुख म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com