Rahul Narvekar News : ठाकरे गटाच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांपाठोपाठ विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचा दौरा रद्द

Thackeray Groups News : नार्वेकरांनी आपला दौरा का रद्द केला, याचे कारण समजू शकले नाही.
Rahul Narvekar News
Rahul Narvekar News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परदेश दौऱ्यावर केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द केला होता. त्याचप्रमाणे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या परदेश दौऱ्यावरही आदित्य ठाकरेंनी टीका केली होती. त्यानंतरही नार्वेकरांचा दौराही रद्द झाला आहे. नार्वेकरांनी आपला दौरा का रद्द केला, याचे कारण समजू शकले नाही.

घाना या देशात होणाऱ्या ६६व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेस नार्वेकर हजेरी लावणार होते . पण, त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत ही परिषद आहे. नार्वेकर यांच्या परदेश दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून जोरदार टीका करण्यात आली होती.

Rahul Narvekar News
Killari Earthquake Thirty Years : काळजाचा थरकाप उडविणाऱ्या किंचाळ्या अन्‌ मृतदेहांचे ढीग…; कार्यकर्त्यांसाठी ती शेवटची पहाट ठरली...

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेवर अध्यक्ष वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेसंबंधित सुनावणी होणार आहे. याशिवाय ठाकरे गटाकडून वारंवार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपत्रातेप्रकरणी जाणूनबुजून वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांनी घानाचा दौरा केला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

"महाराष्ट्रातील लोकशाही… संविधान घाण्याला जुंपून वऱ्हाड निघालंय ‘घाना’ला अशी टीका संजय राऊतांनी केली आहे, तर आदित्य ठाकरे म्हणाले की, एकीकडे आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरू असताना दुसरीकडे राहुल नार्वेकर हे राष्ट्रकुल संसदीय परिषदेला भेट देणार आहेत, परंतु ते कोणत्या आधारावर अशा राज्याचे प्रतिनिधित्व करतील जिथे घटनाबाह्य, असंवैधानिक सरकार आहे आणि ज्याला बेकायदेशीर मार्गांनी संरक्षणही दिलं जातंय? असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला होता. विधानसभा अध्यक्ष जाणूनबुजून सोळा आमदार अपात्रतेबाबतच्या प्रकरणी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com