Ajit Pawar On Sharad Pawar: ...तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? अजित पवारांचा थेट सवाल

Ajit Pawar Latest Speech: त्यानंतर पुन्हा सांगितले की राजीनामा मागे घेतला
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar Speech Today : आता वय ८३ झाले, ८४ झाले. तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? तुम्ही कमिटी करा, सगळे बसा आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना राष्ट्रीय अध्यक्ष करा असे सांगितले होते, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

कमिटी तयार झाली. त्यानंतर पुन्हा सांगितले की राजीनामा मागे घेतला. राजीनामा मागे घतला तर दिला होता कशाला असा थेट सवाल अजित पवार यांनी दिला. मी सुप्रिया सुळेंशी बोललो. तेव्हा त्या म्हणाल्या, ते हट्टी आहेत. आता आमदारांना बोलावले जाते. आमदार गेले नाहीत तर त्यांच्या पत्नीला फोन केला जातो, असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar
Ajit Pawar Group News : अजितदादांचं बंड यशस्वी? दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा; शरद पवारांकडे किती आमदार...

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा (BJP) सत्तेत आली. पदेशातील लोक नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे स्वागत करतात. जर देशामध्ये त्यांना पर्याय नसेल तर त्यांच्यासोबत गेले पाहिजे. त्यामुळे पटण्याच्या सभेमध्ये काय झाले. सगळ्यांचे कटबोळे घेऊन देश चालत नाही, असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar
Rashtrawadi Lok Sabha MPs: राष्ट्रवादीचे खासदार कुणाकडे? तटकरे अन् पटेल अजितदादाकडे तर शरद पवारांकडे...

आम्हाला अनेक बैठकांमध्ये सांगितले की २०२४ मध्ये नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार आहेत. मी उपमुख्यमंत्री आहे, त्यामध्ये माझे तर रेकॉर्ड झाले आहे. मलाही प्रमुख पद मिळवायचे आहे, असे अजित यांनी सांगितले. राष्ट्रवादीचा ७१ चा आकडा पुढे घेऊन जाणाराच. आमची विनंती आहे, आम्हाला आशिर्दावाद द्यावा, असेही पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com