Mumbai NCP : मुंबईत अजितदादांची वाढणार ताकद; पण बळ मिळणार भाजपला !

Ajit Pawar And Mumbai NCP : मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदेंची शिवसेना, अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या मदतीला राहणार
Devendra Fadnavis, Ajit Pawar
Devendra Fadnavis, Ajit PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : मुंबई महापालिकेची सत्ता काहीही करून आपल्या हातात घेण्यासाठी आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आता अजितदादांना आपल्याकडे वळवलेल्या भाजपने या दोघांची पूरेपूर फायदा उठविण्याची नीती आखली आहे. अजिदादांदांना मुंबईच्या राजकारणात ताकदीने उतरवून महापालिका निवडणुकीत आपले बळ वाढवण्याचा भाजपचा छुपा डाव दिसून येत आहे. यातूनच अजित पवारांनीही मुंबईतील समर्थकांची बैठक घेऊन त्यांना कामाला लागण्याचे फर्मान दिल्याचे समजते आहे. अजितदादांच्या या भूमिकेमुळे मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदेंची शिवसेना, अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे भाजपच्या मदतीला राहणार असल्याचे अधोरेखित होत आहे. (Latest Political News)

Devendra Fadnavis, Ajit Pawar
Aditya Thackeray on BMC : मुंबई लुटण्यासाठी भाजप प्रयत्न सुरूच आहेत: आदित्य ठाकरेंचा पुन्हा घणाघात

ठाकरे सरकार घालवल्यानंतर भाजपने आपला मोर्चा मुंबई महापालिकेकडे वळविला आहे. राज्यातील सत्तेचा हवा तेवढा वापर करून मुंबई पालिका जिंकण्याचा भाजपच्या साऱ्याच नेत्यांचा इरादा आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे मुंबई दौरे वाढल्याचे काही महिन्यांत दिसून आले.

ठाकरेंना हरवण्यासाठी शिंदे कुठे कमी पडणार नाहीत याची जाणीव भाजपला आहे, तरीही जोखीम नको म्हणून या निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचीही मते आपल्याकडे घेण्याची नीती भाजपची आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली दौऱ्याहून आलेल्या अजित पवारांनी मुंबईत आज बैठक घेत पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

Devendra Fadnavis, Ajit Pawar
Ajit Pawar Gameplan: अजितदादा आजमावणार मुंबईच्या राजकारणात ताकद; नव्या दमाच्या नेत्यांची फळी उभारणार

शिंदे-फडणवीसांकडे बहुमताचे आकडे असतानाही अजित पवारांना साथीला घेतले. त्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या एकेरी वर्चस्वाला सुरूंग लावण्याचा भाजपचे डाव साधला. आता त्यापलिकडे जाऊन अजितदादांचा अधिकाअधिक फायदा करून घेताना मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता स्थापन करण्याचा भाजपचा डोळा आहे.

मुंबई महापालिका निवडणूक ताब्यात घेण्याच्या मोहिमेत शिंदेंपाठोपाठ अजित पवारही काहीसे फायदेशीर ठरु शकतात, हे हेरून भाजप नेतृत्वाने पवारांना मुंबईत ताकद वाढवण्याचा सल्ला भाजपच्या दिल्ली नेतृत्वाने दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच अजितदादा प्रथमच मुंबईच्या राजकारणात अॅक्शनमोडवर आल्याचे दिसून येत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com