Ajit Pawar : ‘दादा, तुम्ही शब्दाचे पक्के आहात; हे महाराष्ट्राला दाखवू द्या’: शरद पवार गटाने अजितदादांना डिवचले

Sharad Pawar Challenge To Ajit Pawar : ‘दादा, तुम्ही शब्दाचे पक्के असल्याचं महाराष्ट्राला दाखवून द्याच,’ असे आव्हान शरद पवार गटाने अजितदादांना दिले आहे. त्यासोबत बारामतीमधील लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा आणि आजच्या एका कार्यक्रमातील व्हिडिओ जोडण्यात आलेला आहे.
Ajit Pawar-Sharad Pawar
Ajit Pawar-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune, 06 August : ‘अजितदादा, तुम्ही शब्दाचे पक्क आहात, हे महाराष्ट्राला दाखवून द्या’, असे आव्हान देऊन शरद पवार गटाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा डिवचले आहे.

अजित पवार गटाला आव्हान देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दादांच्या शब्दांचा वापर केला आहे. त्यामुळे अजितदादा गटाकडून कसा पलटवार होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार गट (Ajit Pawar Group) आणि शरद पवार गट (Sharad Pawar Group) एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दोन्ही एक गट एकमेकांना पाण्यात पाहत असतात. अगदी वैयक्तिक पातळीवर जाऊन दोन्ही गटाकडून एकमेकांचा समाचार घेतला जातो. आताही अजित पवारांना डिवचताना वर्मी लागणारे बाण सोडण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवारांचा आजचा आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील एक व्हिडिओ ट्विट करत उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ‘दादा, तुम्ही शब्दाचे पक्के असल्याचं महाराष्ट्राला दाखवून द्याच,’ असे आव्हान शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) अजितदादांना दिले आहे. त्यासोबत बारामतीमधील लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा आणि आजच्या एका कार्यक्रमातील व्हिडिओ जोडण्यात आलेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायम ते शब्दाचे पक्के असल्याचे सांगितले. परंतु जर अजित पवार हे स्वतःच आता बारामतीतील पराभव माझ्यामुळेच झाल्याचे मान्य करत असतील, तर त्यांनी शब्दाला जागून येणारी विधानसभा न लढवता राहून दाखवावे...’ असे आव्हान अजित पवारांना देण्यात आले आहे.

बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बोलताना अजित पवार यांनी आम्ही उभा करू उमेदवाराला खासदारकीच्या निवडणुकीत विजयी केलं पाहिजे. तरच मी पुढं विधानसभेला उभा राहीन. हे खरंच तुम्हाला मी सांगतो, असं म्हटलं होते. त्याच व्हिडिओला आजच्या एका कार्यक्रमातील व्हिडिओ जोडण्यात आला आहे. त्यात भेटायला येणाऱ्या लोकांना सरळ सांगून टाकतो की पराभव माझ्यामुळे झाला आहे. बाकी कोणाचा दोष नाही, असे म्हटले आहे.

Ajit Pawar-Sharad Pawar
Congress : काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय; विधान परिषदेला क्रॉस व्होटिंग करणाऱ्या ‘त्या’ पाच आमदारांचे तिकिट कापणार

बारामतीतील प्रचाराचा संदर्भ देऊन अजितदादांनी आपण शब्दाचे पक्के असल्याचे महाराष्ट्राला दाखवून द्यावे आणि विधानसभा निवडणुकीला उभे राहू नये, असे म्हटले आहे. आता अजित पवार गटाकडून त्यावर काय प्रत्युत्तर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com