NCP MLA Meet Sharad Pawar: अजितदादा गटाच्या सर्व आमदारांना शरद पवारांनी विचारला एकच प्रश्न

Ajit Pawar and Leaders Meet Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह सर्व आमदारांनी दुसऱ्यांदा घेतली शरद पवारांची भेट
NCP MLA Meet Sharad Pawar
NCP MLA Meet Sharad PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

NCP News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सर्व मंत्र्यांसह आमदारांनी सोमवारी पुन्हा एकदा शरद पवारांची वाय.बी.चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. अजित पवारांच्या गटाने दुसऱ्यांदा पवारांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीत नेमकं काय चर्चा झाली? याकडे राज्याचे लक्ष लागलेले असतानाच पवारांची भेट घेतलेल्या सर्व आमदारांना शरद पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षाच्या सर्व आमदारांनी शरद पवारांची भेट घेत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ राहण्यासाठी विनंती केली. मात्र, या सर्व आमदारांना शरद पवार यांनी आपआपल्या भागात पेरण्या झाल्या आहेत का? असा प्रश्न विचारत आमदारांच्या भागातील परिस्थितीची विचारपूस केली.

NCP MLA Meet Sharad Pawar
NCP Minister Meet Sharad Pawar: अजित पवारांचा गट दुसऱ्यांदा पवारांच्या भेटीला; राष्ट्रवादीत नेमकं शिजतंय काय?

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पक्षात बंड करत सरकारमध्ये सामील होत पवारांना धक्का दिला. त्यानंतर थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावाही सांगितला. एवढंच नव्हे तर दोन्ही गटांनी स्वतंत्रपणे मेळावे घेत थेट एकमेकांवर टीकास्त्र सोडले. या सर्व घडामोडीनंतर रविवारी अचानक राष्ट्रावादीत नवा ट्विस्ट समोर आला.

NCP MLA Meet Sharad Pawar
Mashal Symbol Hearing: शिवसेनेच्या मशाल चिन्हावर समता पक्षाचा दावा; आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं ?

राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ राहण्यासाठी विनंती केली. पण पवारांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. सोमवारी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सर्व आमदारांसह मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू असल्या तरी आमदारांनी घेतलेल्या भेटीत पवारांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नाची सध्या मोठी चर्चा रंगली आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.