Mashal Symbol Hearing: शिवसेनेच्या मशाल चिन्हावर समता पक्षाचा दावा; आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं ?

Supreme Court On Shivsena Mashal Symbol: मशाल चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी पार पडली.
Supreme Court On Shivsena Mashal Symbol
Supreme Court On Shivsena Mashal SymbolSarkarnama
Published on
Updated on

Mashal Symbol News: केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला दिलेल्या मशाल चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी पार पडली. समता पक्षाने मशाल चिन्हावर दावा करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर या मशाल चिन्हाबाबत आज सुनावणी झाली. मात्र, समता पक्षाकडे संपूर्ण कागदपत्र नसल्याने आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्हांसह शिवसेना पक्ष देण्याचा निर्णय दिला. तर ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्यात आले. पण ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिल्यानंतर समता पक्षाने यावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल केली होती.

Supreme Court On Shivsena Mashal Symbol
NCP Minister Meet Sharad Pawar: अजित पवारांचा गट दुसऱ्यांदा पवारांच्या भेटीला; राष्ट्रवादीत नेमकं शिजतंय काय?

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मिळालेल्या 'धगधगती मशाल' या चिन्हावर समता पार्टीनेही दावा केल्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर मोठा पेच निर्माण झाला. यासंदर्भातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असून आता पुढील सुनावणी ३१ जुलैला पार पडणार आहे. त्यामुळे या सुनावणीत नेमकं काय होणार? याकडे ठाकरे गटाच्या नेत्यांसह शिवसैनिकांचं लक्ष लागलं आहे.

Supreme Court On Shivsena Mashal Symbol
Mashal Symbol Hearing Today: ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला; सर्वोच्च न्यायालयात 'मशाल' चिन्हावर आज महत्त्वाची सुनावणी

दरम्यान, याआधी यासंदर्भात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावली होती. त्यानंतर समता पार्टीने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यामुळे आता मशाल चिन्हांबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com