Amit Shah 10 Instructions : महाराष्ट्र जिंकायचाय...; 'चाणक्य' अमित शाह यांनी दिले 'हे' 10 कानमंत्र

BJP Political News : भाजपचे निवडणुकांमधील त्यांना मिळत असलेले यशामागे त्यांचं संघटन कौशल्यासह जबरदस्त प्लॅनिंग हेही एक महत्त्वाचं कारण आहे. महाराष्ट्र निवडणुकीसाठीही अशीच मोर्चेबांधणी,रणनीती भाजपकडून आखली जात आहेत.
Amit Shaha
Amit Shahasarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेला दारुण पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे.

त्यामुळेच या निवडणुकीसाठी महाराष्ट्रावरच पूर्ण फोकस ठेवला आहे. तसेच महाविकास आघाडीने केलेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजप नेत्यांचे महाराष्ट्र दौरे वाढले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठीची महायुतीसह भाजपच्या व्यूहरचनेवर जोरदार काम सुरू केले आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राचे दौरे वाढवले आहेत. शाह यांनी मंगळवारी(ता. 1) मुंबईत दादरमध्ये भाजपचा मेळावा पार पडला.

तसेच पुढील दोन दिवसांत शाह मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील भाजप (BJP) नेते,पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत.या मेळाव्यात अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

Amit Shaha
BJP Political News : विधानसभा निवडणुकीच्या आधीच भाजपला धक्का; 'या' बड्या नेत्याने पक्षाला दिली सोडचिठ्ठी!

भाजपचे निवडणुकांमधील त्यांना मिळत असलेले यशामागे त्यांचं संघटन कौशल्यासह जबरदस्त प्लॅनिंग हेही एक महत्त्वाचं कारण आहे. महाराष्ट्र निवडणुकीसाठीही अशीच मोर्चेबांधणी,रणनीती भाजपकडून आखली जात आहेत. अमित शाहांनी आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना साम-दाम-दंड-भेद वापरण्यास सांगितले आहे.

अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना दिल्या 'या' महत्त्वाच्या 10 सूचना

* महाराष्ट्रातील प्रश्न सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत.

* सरकार आपले आहे, त्यामुळे आपल्या नगरसेवक, आमदार व खासदारांच्या विरोधात असलेली नाराजी दूर करा.

* 10 टक्के मतदान वाढवा.

* प्रत्येक बूथवर आपल्याला 10 कार्यकर्ते पाहिजेत.दसऱ्यापासून प्रचार संपेपर्यंत हे कार्यकर्ते त्यांच्या बुथच्या कक्षेत फिरत राहतील.

* महाराष्ट्र सरकार ज्या योजना आणेल ती कार्यान्वित करा. मंडल आणि वॉर्ड स्तरावर योजना पोहोचवा. विजय आपलाच होईल.

Amit Shaha
Solapur BJP : विरोधातील पदाधिकाऱ्यांची संख्या पाहून देशमुख समर्थकांची एकच पळापळ...

* जे आपले मतदार नाही, त्या कुटुंबांना भाजपचे सदस्य करा. हारतुरे घालून निवडणूक जिंकता येत नाही. मतं वाढली तरच निवडणूक जिंकता येते.

* ज्यांना पक्ष सोडून जायचं आहे, त्यांनी बिनधास्त जावं.

* दुसर्‍या पक्षातील नाराज,काठावरच्या नेते, कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात आणा.

* आगामी निवडणुका जिंकायच्याच असल्याने साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर करा.

* प्रत्येक बूथवर किमान 20 लोकांना भाजपचे सदस्य करा. सदस्य करताना मतं मागू नका.

* महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा व दशा बदलेल.

* संघटनेतील मतभेद, वेगवेगळ्या दिशेने काम करणं, यामुळे ती संघटना कधीच यशस्वी होत नाही. आपल्याला निवडणुकीआधी हे मतभेद दूर करायचे आहेत.

* काम करताना वाद होतोच, पण तो वाद संपवता आला पाहिजे.

Amit Shaha
Pune BJP News : 'कसब्या'साठी भाजपकडून जुना की नवा भिडू? उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये 'पोस्टर वॉर'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com