Mashal Symbol Hearing Today: ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला; सर्वोच्च न्यायालयात 'मशाल' चिन्हावर आज महत्त्वाची सुनावणी

Supreme Court On Shivsena Mashal Symbol: सत्तासंघर्षाच्या दरम्यान निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाणाचे चिन्ह दिले तर ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्यात आले.
Uddhav Thackeray, Supreme Court
Uddhav Thackeray, Supreme CourtSarkarnama
Published on
Updated on

Supreme Court Hearing On Mashal Symbol: राज्य विधीमंडळाचे अधिवेशन आजपासून (१७ जुलै) सुरु होत आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने दिलेल्या मशाल चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे.

सत्तासंघर्षाच्या दरम्यान निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाणाचे चिन्ह दिले तर ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्यात आले. २००४ मध्येत समता पक्षाची राज्यातली मान्यता काढण्यात आली होती. त्यानंतर शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगानं ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल चिन्हं दिलं. पण समता पार्टीने यावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

Uddhav Thackeray, Supreme Court
Ahmednagar NCP News: हल्ल्यात जखमी झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू : भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदेसह पाच जणांना अटक

आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला.  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळालेल्या 'धगधगती मशाल' चिन्हावर समता पार्टीनेही दावा केला आहे. १९९६ पासून हे चिन्ह आपल्याकडे असल्याचा दावा समता पक्षाने केला आहे. समता पक्षाने यापूर्वी उच्च न्यायालायने याचिका केली होती. पण त्यांची याचिका फेटाळून लावली.

Uddhav Thackeray, Supreme Court
NCP Crisis Update : दादा की साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसमधील कुणाचं पारडं जड ? लवकरच 'फैसला' !

त्यानंतर समता पक्षाने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावर आज (१७ जुलै) सुनावणी होणार आहे.त्यामुळे या सुनावणीत नेमकं काय होणार, याकडे ठाकरे गटाच्या नेत्यांसह शिवसैनिकांचं लक्ष लागलं आहे.

निवडणूक आयोगानुसार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळाले 'मशाल' हे चिन्ह अंतरिम नाही. अंधेरी पोटनिवडणुकीनंतर त्याच्या चिन्हाबाबत पुर्नविचार केला जाऊ शकतो, अस निवडणूक आयोगाने समता पक्षाला सांहितलं होतं. पण त्यानंतरही समता पक्षाने कोर्टात धाव घेतली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com