Anil Deshmukh-अनिल देशमुखांसाठी उद्याचा दिवस महत्वाचा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नियमित जामीन अर्जावर उद्या उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे
Anil Deshmukh
Anil Deshmukh Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी पाच महिन्यांपासून अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) नियमित जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर उद्या शुक्रवारी (ता. २५ मार्च) सुनावणी होण्याची शक्यता आहे. (Anil Deshmukh's bail application to be heard in High Court tomorrow)

मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत आलेल्या देशमुख यांच्या विरोधात सीबीआय आणि ईडीने तपास सुरू केला आहे. देशमुख सध्या आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. यापूर्वी सत्र न्यायालयाने देशमुखांचा डिफॉल्ट जामीन अर्ज फेटाळला होता.

Anil Deshmukh
मन्या सुर्वेचं एन्काउंटर करणारे इसाक बागवान फडणवीसांच्या निशाण्यावर

सत्र न्यायालयाने डिफॉल्ट जामीन अर्ज फेटाळल्यानंतर देशमुख यांनी पीएमएलए न्यायालयात नियमित जामिनासाठी केलेला अर्जही अतिरिक्त न्यायाधीश राहुल रोकडे यांनी फेटाळला होता. आर्थिक गैरव्यवहारात माजी गृहमंत्री देशमुख सक्रिय असल्याचे सकृतदर्शनी पुराव्यातून दिसत आहे. तसेच, पोलिस दलातील बदल्या आणि नियुक्त्यांमध्ये देशमुखांकडून हस्तक्षेप होत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने या निकालपत्रात नोंदविले होते. या निकालाला आव्हान देत देशमुखांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

Anil Deshmukh
आमदार राजेंद्र राऊतांच्या मुलांचा जीव धोक्यात : फडणवीसांचा गंभीर आरोप

परमबीर सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांच्यावर विविध प्रकरणांमध्ये पाच गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी महाराष्ट्र पोलिसांना दिला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला मोठा दणका बसला आहे.

Anil Deshmukh
राज्‍यात ठाकरे सरकार असले तरी, पुणे जिल्ह्यात पवार सरकार : आढळरावांनी व्यक्त केली खदखद!

परमबीरसिंह यांच्यावर खंडणीसह विविध प्रकरणांमध्ये पाच फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांचा तपास महाराष्ट्र पोलिसांकडून केला जात आहे. हे गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी परमबीरसिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. राज्य सरकारकडून सूड भावनेने गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याची योग्य प्रकारे चौकशी होणार नाही, अशी बाजू परमबीरसिंह यांनी न्यायालयात मांडली होती.

Anil Deshmukh
जानकरसाहेब, दुसरे एक मित्र जवळ आल्याने सध्या तुमच्याकडे दुर्लक्ष : अजितदादांनी घेतली फिरकी

सर्वोच्च न्यायालयाने परमबीरसिंह यांची ही मागणी मान्य केली आहे. न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला याबाबतचे आदेश दिले आहेत. पुढील आठवडाभरात पोलिसांनी सीबीआयकडे हा तपास वर्ग करावा, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. तसेच यापुढे त्यांच्यावर दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा तपासही सीबीआयकडे देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तसेच, याबाबत सर्वप्रकारचे सहकार्य करावे, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे परमबीरसिंह यांना दिलासा मिळाला आहे.

Anil Deshmukh
महावितरणचे मुख्य तपास अधिकारी सुमित कुमारांच्या निलंबनाची ऊर्जामंत्र्यांनी केली घोषणा

दरम्यान, परमबीरसिंह यांच्यावर दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यांचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग करीत आहे. सीआयडीच्या हाती या प्रकरणी धक्कादायक माहिती आली समोर होती. श्यामसुंदर अग्रवाल याने छोटा शकीलद्वारे धमकी दिल्याचा आरोप विकसक संजय पुनमिया याने केला होता. मात्र, तपासात हे कॉल श्यामसुंदला अडकवण्यासाठी पुनामियाने हॅकरच्या मदतीने स्वत:च्याच कार्यालयातूनच केल्याचे समोर आले आहे. हा सर्व कट परमबीरसिंह याच्या सांगण्यानुसारच रचला गेल्याचा खुलासाही हॅकरने चौकशीत केला आहे. विशेष म्हणजे, छोटा शकीलचा आवाज आणि फोनचे लोकेशन पाकिस्तानामधील कराची दाखवण्यासाठी पुनामियाने विशेष सॉफ्टवेअर आणि व्हीपीएनचा वापर केला होता. असं सीआयडीच्या तपासात समोर आलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com