

Vasai Virar News: जानेवारी महिन्यात राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या. त्यात बहुतांश ठिकाणी महायुती वा भाजप सत्तेवर आली आहे. पण वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत पूर्णपणे ताकद लावूनही भाजपचा धुव्वा उडाला. तिथे बहुजन विकास आघाडीनं बहुमताचा आकडा गाठत सत्ता कायम राखली. आता याच महापालिकेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी धडाकेबाज व अत्यंत कडक शिस्तीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंची नियुक्ती करा,अशी मागणी भाजपचे वसई रोड मंडळ अध्यक्ष आणि माजी नगरसेवक महेश सरवणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यामुळे मुख्यमंत्री फडणवीस या मागणीनंतर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे.
प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढेंची थेट आयुक्तपदी नियुक्ती करण्याच्या मागणी भाजप नेत्यानं करतानाच मोठे गंभीर आरोप केले आहे. महेश सरवणकर यांनी वसई विरार महापालिकेत बोकाळलेला भ्रष्टाचार, प्रशासनाचा बेशिस्त व ढिसाळ कारभार, तसेच दिवसागणिक शहराचे झपाट्याने होत चाललेले बकालीकरण आदी मुद्दे गंभीर मुद्दे मांडले आहेत. हे सर्व रोखण्यासाठीच वसई विरार महापालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी आग्रही मागणी सरवणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे.
वसई विरार महापालिकेवर मागील पाच वर्षांपासून प्रशासकराज होतं. पण जानेवारी महिन्यात पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये बहुजन विकास आघाडीनं पुन्हा एकदा सत्ता स्थापन करत वसई विरारमध्ये अद्यापही हितेंद्र ठाकूरांचाच दबदबा असल्याचं दाखवून दिलं आहे. तर भाजप महापालिकेत विरोधी बाकावर आहे. विरोधकाच्या भूमिकेतून भाजप आता बविआला अडचणीत आणण्यासाठी एकापेक्षा एक सरस डावपेच टाकण्याच्या तयारीत आहे.
भाजपनं आता वसई विरार महापालिकेत गेल्या पाच वर्षांत प्रशासकीय राजवटीत घडलेल्या घोटाळ्याची विविध प्रकरणे उघडकीस आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पालिका प्रशासकीय पातळीवर कठोर निर्णय घेत प्रशासकीय कामात एक शिस्तबद्धता आणण्यासाठी, भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी वसई-विरार महापालिकेचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढेंची नियुक्ती करण्याची मागणी जोरदार मागणी केली जात आहे.
सध्याचे वसई विरार महापालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी सेवानिवृत्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर सूर्यवंशी यांच्यानंतर आता वसई-विरार महापालिकेचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढेंना नियुक्त करण्यात यावे,अशी जोरदार मागणी जोर धरू पाहत आहे.
भाजपचे नगरसेवक महेश सरवणकर यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जोर लावला आहे. महापालिकेच्या तिजोरीत असलेला खडखडाट,ढासळलेली आर्थिक स्थितीही आहे. महापालिकेत गेल्या पाच वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत अधिकारी व कर्मचारी अत्यंत मनमानी आणि बेशिस्तपणे वागत असल्याचं आरोप केले आहे.
वसई विरार शहरातील वाहतूक कोंडी, परिवहन व्यवस्था,अवैध बांधकामे, अतिक्रमण, महापालिका क्षेत्राचे बकालीकरण,कोलमडलेली आरोग्य व्यवस्था, सांडपाणी प्रकल्प, या सर्व गोष्टींमुळे वसई-विरार महापालिका अडचणीत येत आहे. हापालिका क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे. त्याचा फटका शहराच्या सर्वांगीण विकासाला बसला आहे.
भाजपचे नगरसेवक महेश सरवणकर यांनी वसई विरारच्या सर्वांगीण विकासासाठी कर्तव्यदक्ष व कठोर आयएएस अधिकार्याची वसई-विरार महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती होणं गरजेचं आहे, असं भाजपचे माजी नगरसेवक सरवणकरांनी सांगितलं आहे.
याचमुळे प्रशासनावर प्रचंड वचक असलेला,धडाकेबाज व कठोर निर्णय घेताना मागचा पुढचा विचार न करणारे तुकाराम मुंढे यांच्यासारखा कर्तव्य तत्पर अधिकार्याची वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली तर भविष्यात वसई-विरार शहराचा सर्वांगीण विकासाला करणं सोयीचे होईल, असे मतही सरवणकर यांनी नमूद केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.