फडणवीसांच्या स्वागतासाठी भाजप आमदारांची घोषणा; 'कोण आला रे..कोण आला...'

Shivsena| BJP| Politics| शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक ही घोषणा देतात.
Devendra Fadanvis
Devendra Fadanvis
Published on
Updated on

मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या (Nawab Malik) राजीनाम्यासाठी प्रचंड ताकद निश्चित केलेल्या भाजपच्या (BJP) मोर्चाला परवानगी नाकारल्याने संतापलेल्या भाजप आमदारांनी विधानभवनात ठाकरे सरकारविरोधात रणशिंग फुंकले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadanvis) विधानभवनात 'एन्ट्री' होताच, 'कोण आला रे... कोण आला... महाराष्ट्राचा वाघ आला... 'ही शिवसेनेची घोषणा 'हायजॅक' करून जशास तसे तोंड देण्याचा निर्धारच भाजपने केल्याचे दिसून आले.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक ही घोषणा देतात. मात्र, भाजप आमदारांनी पहिल्यांदाच विधानभवनात फडणवीस यांच्यासाठी अशी घोषणा केल्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले गेले.

Devendra Fadanvis
राऊतांचा लढा आणखी तीव्र होणार; राहुल गांधींनी मांडली काँग्रेसची भूमिका

शिवसेनेच्या बैठका, कार्यक्रम आणि सभांत दिवगंत बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख म्हणून उद्वव ठाकरे यांचे आगमन होताच, कोण आला रे कोण आला... या घोषणेने परिसरात दणाणून जायचा. यानिमित्ताने विरोधकांना इशाराच दिला जात असल्याचे मानले जाते. त्यात भाजप आमदारांनी शिवसेनेच्या स्टाइलने घोषणाबाजी केल्याची चर्चा विधानभवनात होती.

Devendra Fadanvis
आमच्यावर आरोप करताहेत..तुमच्याकडेही चार बोट आहेत ; गृहराज्यमंत्र्यांचा इशारा

मलिकांच्या राजीनाम्यावर अडून बसलेल्या भाजपने बुधवारी राणीची बाग ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. मात्र, परीक्षांचा कालावधी असल्याचे सांगून या मोर्चाला परवानगी नाकारली गेली. त्यानंतर विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आमदारांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आणि भीतीपोटीची सरकारने मोर्चा रोखल्याचा आरोप केला. आमदारांनी सकाळी सव्वादहा वाजताच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरवात केली. तेव्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात आले. त्यानंतर काही मिनिटांत फडणवीस विधानभवनाच्या आवारात तेव्हा, कोण आला रे.. कोण आला... अशी घोषणा देत आंदोलन करणाऱ्या आमदारांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान, या मोच्यानिमित्ताने शिवसेना आणि भाजप नेते सभागृहाबाहेर आमनेसामने आले आहेत. नव्या मुद्यांवरून या दोन्ही पक्षांत रोज आकांडतांडव होत असल्याचे दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com