Tejasvee Ghosalkar: भाजपनं 48 तासांतच गेम फिरवला? ठाकरेंसोबत असल्याचा दावा करणाऱ्या तेजस्वी घोसाळकरांना मुंबई बँकेत मोठी जबाबदारी

Mumbai Jilha Bank : मुंबई जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तेजस्वी घोसाळकरांच्या संचालकमंडळातील एन्ट्रीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. पण आता त्यांच्या या संचालक मंडळाच्या एन्ट्रीनंतर आता घोसाळकरांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना पुन्हा हवा मिळण्याची शक्यता आहे.
Uddhav Thackeray | Tejasvi Ghosalkar
Uddhav Thackeray | Tejasvi Ghosalkar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपसह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं जोर लावल्यानंतर उद्धव ठाकरेंना एकावर एक धक्के देत महत्त्वाच्या नेत्यांना पक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. यातच ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ राहिलेल्या स्थानिक नेतृत्वावरील नाराजीतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर (Tejasvee Ghosalkar) यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांनाही उधाण आले होते. पण अशातच एक मोठी अपडेट समोर आली आहे.

भाजपची सत्ता असलेल्या मुंबई जिल्हा बँकेच्या संचालक पदावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकीकडे घोसाळकरांनी स्थानिक विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत राजीनामा दिल्याची माहिती समोर आली होती. मातोश्रीवर याबाबत अनेकवेळा नाराजी व्यक्त केल्यानंतरही पक्षाकडून दखल न घेतल्यामुळे तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आल्यानं एकच खळबळ उडाली होती.

याचदरम्यान, आता माजी नगरसेविका आणि अभिषेक घोसाळकरांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना संचालकपद देण्यात आले आहे. येत्या काळात होत असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून (BJP) घोसाळकर यांची मुंबई महापालिकेच्या संचालकपदी करण्यात आलेली नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.

याबाबत मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष भाजप नेते प्रविण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,अभिषेक घोसाळकर यांच्या दुर्दैवी हत्येनंतर बँकेकडून सद्नभावनेनं हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी अभिषेक घोसाळकर मुंबई बँकेत संचालक होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर संचालक पदाची जागा रिक्त होती. आता त्या जागेवर अभिषेकची यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना संचालकपद देण्यात आले आहे.

Uddhav Thackeray | Tejasvi Ghosalkar
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे अखेर कंडका पाडणारच! मनसे युतीबाबत आमदार-खासदारांशी निर्णायक चर्चा

दरेकर म्हणाले, तेजस्वी घोसाळकरांच्या बाबतीतला हा निर्णय संचालक मंडळाने एकमताने निर्णय घेतला आहे. जागा रिक्त असल्यानं ती भरणं क्रम प्राप्त होतं.एकीकडे तेजस्वी घोसाळकरांच्या नाराजीच्या चर्चा जोर धरु लागल्या असतानाच दुसरीकडे त्यांचे सासरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेताना भावुक झाले होते.

पक्षांतर्गत नाराजीला कंटाळून तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा होती. पण त्यांचे सासरे व माजी आमदार विनोद घोसाळकरांनी मात्र, आपली सून तेजस्वी घोसाळकरांवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेना आणि भाजपकडून पक्षप्रवेश करण्यासंदर्भात दबाव टाकण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती.

Uddhav Thackeray | Tejasvi Ghosalkar
Shivsena-MNS : भुजबळांच्या पराभवानंतर राज-उद्धव यांनी जो जल्लोष केला होता, तसा जल्लोष पुन्हा व्हावा; सोलापुरातील शिवसैनिकांची नांदगावकरांपुढे इच्छा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी विनोद घोसाळकर यांच्यासह पत्रकार परिषदत घेत गंभीर आरोप केले होते. याचवेळी संजय राऊतांनी अभिषेक घोसाळकरांचं नाव काढताच घोसाळकर भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते. तसेच आपण आणि सून तेजस्वी घोसाळकरही उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं जाहीर केलं होतं.

पण दुसरीकडे जवळपास गेल्या वर्षभरापासून मुंबई बँकेचे संचालकपद मिळावे यासाठी तेजस्वी घोसाळकर यांनी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले होते. अखेर गुरुवारी (ता.19) झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घोसाळकरांच्या संचालकमंडळातील एन्ट्रीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. पण आता त्यांच्या या संचालक मंडळाच्या एन्ट्रीनंतर आता घोसाळकरांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना पुन्हा हवा मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com