BRS Political News : 'बीआरएस'ने महायुती आणि आघाडीचं टेन्शन वाढवलं; आगामी निवडणुकांसाठी १५ जणांची सुकाणू समिती

Political News : शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस यांना गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही.
BRS In maharashtra Election :
BRS In maharashtra Election :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : अजित पवारांच्या बंडखोरी आणि युती सरकारमधील सहभागामुळे राजकीय सत्तासमीकरणे बदलली आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतही उभी फूट पाडण्यात भाजपला यश आले आहे. तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीतील बंडखोरींनंतर महाविकास आघाडी खिळखिळी झाली आहे. हीच संधी साधत 'बीआरएस'कडून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह विधानसभा-लोकसभेसाठी मोठे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (K.Chandrshekhar Rao) यांच्या 'भारत राष्ट्र समिती'ने महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भातनंतर आता संपूर्ण महाराष्टावर लक्ष केंद्रीत केले आहे. मराठवाडा, विदर्भातील माजी आमदारांना, नेतेमंडळींना गळाला लावल्यानंतर बीआरएसने आपल्या राजकीय रणनीतीचं पुढचं पाऊल टाकलं आहे.

BRS In maharashtra Election :
KCR In Maharashtra : 'बीआरएस' महाराष्ट्रात शड्डू ठोकणार; लोकसभेच्या तयारीसाठी १५ जणांची समिती!

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत 'बीआरएस'कडून १५ जणांची सुकाणु समिती नेमण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी स्वत:कडे ठेवले असून त्यात पाच माजी आमदारांचा समावेश केला आहे.

या सुकाणू समितीत नुकताच 'बीआरएस'मध्ये प्रवेश केलेले भानुदास मुरकुटे, शंकर आण्णा धोंडगे, हरीभाऊ राठोड, आण्णासाहेब माने, दिपक आत्राम, घनशाम शेलार, सुरेखा पुणेकर, माणिक कदम, ज्ञानेश वाकुडकर, सचिन साठे, के.व्ही.राव, मौलाना कादीर, यशपाल भिंगे व फिरोज पटेल या नेतेमंडळींचा सुकाणू समितीत समावेश करत चंद्रशेखर राव यांनी मोठी जबाबदारी दिली आहे.

BRS In maharashtra Election :
Kolhapur Political News : काय सांगता ! कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यातील एकमेकांचे कट्टर विरोधक मुश्रीफ आणि घाटगेंमध्ये 'दिलजमाई'

बीआरएस(BRS) महाराष्ट्रात स्वत:चे राजकीय अस्तित्व निर्माण करत आहेत. नांदेड, नागपूर, सोलापूर येथे के चंद्रशेखर राव यांनी सभा घेतल्या होत्या. अनेक नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळात बीआरएस नवीन पर्याय देणार का?, हे आगामी निवडणुकांनंतर स्पष्ट होणार आहे.

राष्ट्रवादी(NCP), शिवसेना, काँग्रेस यांना मतदान टाकलं तरी ते लोक भाजपकडे जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सक्षम पर्याय बीआरएस देणार आहे. येणाऱ्या काळात बीआरएसचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणार आहे. बीआरएसना भाजपची टीम आहे ना काँग्रेसची टीम आहे. आम्ही शेतकऱ्यांची टीम आहोत. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस यांना गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा इशारा बीआरएसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी दिला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com