Chemical Tanker Overturns : उड्डाणपुलावर केमिकल टँकर पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कोंडी, परिसरात घबराट

Mumbai-Ahmedabad Highway : गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणारा एनसीडी पॉलिएस्टर केमिकलने भरलेला टँकर भरधाव वेगात जात असताना चारोटी उड्डाणपुलावरील डिव्हायडरला धडकला
Chemical Tanker Accident on Mumbai-Ahmedabad Highway Causes Concern
Chemical Tanker Accident on Mumbai-Ahmedabad Highway Causes Concernsarkarnama
Published on
Updated on

महेंद्र पवार

Mumbai News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी उड्डाणपुलावर गुरुवारी (ता. १७) दुपारी अडीचच्या सुमारास केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याने परिसरात मोठी घबराट निर्माण झाली. अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही मार्गिका बंद करण्यात आल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणारा एनसीडी पॉलिएस्टर केमिकलने भरलेला टँकर भरधाव वेगात जात असताना चारोटी उड्डाणपुलावरील डिव्हायडरला धडकला. त्यानंतर टँकर पुलावरच पलटी झाला. टँकरमधून ऑइल पेंट व पॉलिएस्टर आर-६५ प्रकारचे रसायनयुक्त पेंट मोठ्या प्रमाणात पुलावर सांडून वाहत होते. या अपघातात टँकरचालक गंभीर जखमी झाला असून, पोलिसांनी त्याला तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाणपुलावरील दोन्ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत. सध्या दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांवरून वाहतूक वळविण्यात आली असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

Chemical Tanker Accident on Mumbai-Ahmedabad Highway Causes Concern
UP Political news : भाजपला मोठा झटका, सहावेळा मंत्री राहिलेल्या ओबीसी नेत्याने ठोकला रामराम

दरम्यान, पुलावर पलटी झालेला टँकर आणि त्यातून सांडलेल्या केमिकलयुक्त पेंटची पाहणी करून टँकर सुरक्षितपणे बाजूला करण्याच्या उपाययोजना सुरू आहेत. रसायनामुळे कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी बोईसर येथून केमिकल तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण केले आहे. तज्ज्ञांच्या पाहणीनंतर टँकर हटविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

दोन वर्षांपूर्वीही झाला होता भीषण अपघात

चारोटी उड्डाणपुलावर याच परिसरात सुमारे दोन वर्षांपूर्वी केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन पुलावरून खाली कोसळला होता. या भीषण अपघातात सहा ते सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे गुरुवारी पुन्हा त्याच ठिकाणी केमिकल टँकर पलटी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Chemical Tanker Accident on Mumbai-Ahmedabad Highway Causes Concern
Disha Salian Case: आदित्य ठाकरे, अनिल देशमुख अडचणीत? दिशा सालियन प्रकरणी 500 कोटींची मानहानीची नोटीस

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com