Eknath Shinde Speech News : '' ...ही करामत डॉ. एकनाथ शिंदेंनी केली !''; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना मिश्किल टोला

Shivsena Vardhapan Din : ''...तीही गोष्ट बाप म्हणून देऊ शकलो नाही!''
Eknath Shinde Speech News
Eknath Shinde Speech News Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोरेगाव येथील शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उध्दव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडताना गळ्यात पट्टा वगैरे घातला होता. पण दुसऱ्याच दिवशी गळ्यातील पट्टाही निघाला आणि माणूस तरातरा चालायला लागला ही करामत डॉ. एकनाथ शिंदेंनी केली असा मिश्किल टोला मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना लगावला.

शिवसेने (Shivsena)चा सोमवारी( दि.१९) ५७ वा वर्धापन दिन आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात चौफेर फटकेबाजी करतानाच उध्दव ठाकरेंच्या टीकेवर जोरदार पलटवारही केला. आज शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनी ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं जात आहे. शिंदे म्हणाले, "मुख्यमंत्रीपदावरुन पाय उतार होताना उद्धव ठाकरेंनी काय नाय ते सगळं केलं. वर्षावरुन खाली जाताना आम्हाला घरातून बाहेर काढलं, आमच्यावर अन्याय झाला असं ते सांगत होते. यावेळी त्यांच्या गळ्यावर पट्टा होता.

Eknath Shinde Speech News
Uddhav Thackeray News : ''अमित शाहांना महाराष्ट्रात येवून उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे करावे लागते''

मोठ्या मोठ्या बॅगा वर्षाबाहेर चालल्या होत्या. काही लोकांना या बॅगा घ्यायला सांगितलं. काही लोकांना रडायला लावलं होतं, पण सत्ता येते जाते एवढं मनाला लावून घ्यायचं नसतं. पण दुसऱ्या दिवशी गळ्यातला पट्टा गायब! सगळं गायब, तरातरा माणूस चालायला लागला. ही कोणाची करामत माहिती आहे का? डॉ. एकनाथ शिंदेची ही करामत आहे, अशा शब्दांत CM शिंदे यांनी उद्धव ठाकरें(Uddhav Thackeray) वर हल्लाबोल केला.

लोकसभेची निवडणूक होती. आई रुग्णालयात उपचार घेत होती. डॉक्टरचा फोन आला. तेव्हाच माझ्या मनात पाल चुकचुकली. माझ्या शेजारी गावित उभे होते. त्यांनी मला सांगितलं की, इथे आपल्या सभा आहेत. या सभा नऊ वाजेपर्यंत संपतील. त्याला मी कसं सांगू की, माझ्या आईचा जीव गेलाय, ती आता जगात नाही.

मी त्यांना सांगितलं की, आपण सभा पूर्ण करुयात, सभा पूर्ण करुन आलो आणि हॉस्पिटलमध्ये आईचं अंतिम दर्शन घेतलं. असे अनेक प्रसंग जीवनात आले हे सांगताना एकनाथ शिंदे भावूक झाले.

Eknath Shinde Speech News
Eknath Shinde On Uddhav Thackeray : '' रिक्षावाल्याने ठाकरेंच्या मर्सिडीजला खड्ड्यात घातलं...''; मुख्यमंत्री शिंदेंचा घणाघात

''...तीही गोष्ट बाप म्हणून देऊ शकलो नाही!''

एकनाथ शिंदे(Eknath Shinde) भाषणात म्हणाले, “मला आठवतंय श्रीकांत डॉक्टर झाला. एमबीबीएस झाला. सर्जन झाला. त्याने मला एकच गोष्ट मागितली. मला रुग्णालय बांधून द्या, असं तो म्हणाला. पण मी तुम्हाला सांगतो, त्याचा बाप त्याला रुग्णालय बांधून देऊ शकला नाही. रुग्णालय बांधायचा विचार करायचो, तेव्हा कुठली तरी निवडणूक यायची. मग रुग्णालयाचा विषय मागे पडायचा.”

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ७५ कोटी वाटले...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे अडीच वर्षात दोन कोटी वाटले होते. या पठ्ठ्याने एका वर्षात ७५ कोटी वाटले. अरे त्याचा जीव वाचवा. एका मुलाचे दोन्ही पाय गेले होते. एक हात गेला होता. त्याला मदत मिळाली नव्हती. व्हीलचेअरवर त्याचा बाप घेऊन आला होता. पाच लाख लिहिले आणि धनादेश दिला. त्या बापाच्या डोळ्यात पाणी तरळलं हे आमचं काम आहे असंही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Eknath Shinde Speech News
Uddhav Thackeray Speech: कोरोनाची लस मोदींनी काढली; फडणवीसांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ दाखवत ठाकरेंनी उडवली खिल्ली

आम्ही आरोपांना उत्तर कामातून देणार आहे . तेच टोमणे, तेच आरोप नवीन काही नाही. त्यांना निदान नवीन स्क्रिप्ट तरी बदलायला सांगा असा टोलाही शिंदेंनी लगावला. शिंदे म्हणाले, उध्दव ठाकरे तुम्ही कुठे होता. किती केसेस झाल्या आहेत असा सवाल ठाकरेंना विचारला. महाराष्ट्र माझा परिवार आहे. रिक्षावाला - शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा प्रवास कष्ट, मेहनत आणि तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळेच झालो आहे. सर्व आरोपांना आम्ही कामातून उत्तर दिले.

'' तुम्ही वर्षावरून मंत्रालयात जाऊन दाखवलं नाही...''

उध्दव ठाकरेंनी राज्यव्यापी शिबिरात पंतप्रधान मोदी,अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल केला होता.त्यावरुन मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंचा समाचार घेतला. शिदे म्हणाले,“कालच्या भाषणात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांना किती शिव्या दिल्या. अब्दाली, हिटलर, अफजल खान म्हटलं. अरे ते कुठं, तुम्ही कुठं… सर्व राज्याने पाहिलं आहे. जेव्हा एक नोटीस आली की, लगेच मोदींना भेटण्यासाठी गेला. शिष्टमंडळ बाहेर ठेवलं आणि शिष्टाई आतमध्ये गेली.

Eknath Shinde Speech News
Devendra Fadnavis on Thackeray : '' महाराष्ट्रातले खरे गद्दार तर उध्दव ठाकरेच...''; देवेंद्र फडणवीसांचा तिखट बाण

ते जोपर्यंत बघत नाहीत, तोपर्यंत ठीक आहे. बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई आहे. त्यामुळे आपल्या मर्यादेत आणि कुवतीत राहा. काल भाषणात म्हणाले, मणिपूरला जाण्याची हिंमत दाखवा. अरे मणिपूर काय मोदींनी पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक करून दाखवला. तुम्ही वर्षावरून मंत्रालयात जाऊन दाखवलं नाही असा टोला शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.