Ajit Pawar : अजितदादांची बनावट सही करायचा अन् स्वत: सरकारी अधिकारी असल्याचं सांगून करायचा फसवणूक

Fake Signature of DCM Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बनावट सही करून स्वतःला त्यांचा विशेष कार्य अधिकारी असल्याचं सांगत एका व्यक्तीने लोकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर अजितदादांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 12 Jan : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची बनावट सही करून स्वतःला त्यांचा विशेष कार्य अधिकारी असल्याचं सांगत एका व्यक्तीने लोकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर अजितदादांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या लेटरहेड आणि शिक्क्याचा वापर करून एका आरोपीने फसवणूक केल्याचं प्रकरण ताज असतानाच आता अजित पवारांच्या सही आणि लेटरहेडचा देखील गैरवापर झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा विशेष कार्य अधिकारी असल्याचं सांगत एक व्यक्ती अजित पवारांच्या बनावट सह्या करत होता. या आरोपीने अजितदादांचं बनावट लेटरहेड देखील बनवलं होतं. अजित पवारांची बनावट सही करणारा आणि त्यांचा विशेष कार्य अधिकारी असल्याचं सांगणार्‍या प्रवीण साठे (वय 42) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Ajit Pawar
Amit Shah : "खोटारडेपणा करून मुख्यमंत्री बनलेल्या..." शिर्डीतील अधिवेशनातून अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

साठे हा मूळचा सातारचा असल्याची माहिती आहे. तर तो सरकारी अधिकारी असल्याचं सांगत लोकांची आर्थिक फसवणूक करत असल्याची तक्रार पुण्यातील अतुल शितोळे यांनी मलबार हिल पोलिसांकडे दिली आहे. त्यानुसार आता साठेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याने अजित पवारांच्या सहीद्वारे किती आणखी किती जणांची फसवणूक केली आहे याचा तपास पोलिस करत आहेत.

Ajit Pawar
Devendra Fadnavis : महापालिका निवडणुका कधी होणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच केले

दरम्यान, आज पुणे दौऱ्यावर असलेल्या अजितदादांना पत्रकारांनी धनंजय मुंडे यांच्या राजनाम्याबाबतचा प्रश्न विचारताच ते काहीसे भडकल्याचं पाहायला मिळालं. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत असताना अजित पवार त्यांना पाठीशी घालत आहेत का? असा प्रश्न विचारला असता पत्रकारांच्या प्रश्नावर अजितदादा भडकले. ते म्हणाले, चौकशीत नाव आली तर होईल सर्वाची चौकशी. परंतु धनंजय मुंडे यांचं नाव नसतानाच कशी चौकशी होईल. तुझं नाव नसताना तुझी चौकशी होईल का? असा उलटप्रश्न त्यांनी पत्रकाराला केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com