FDA News: तुकाराम मुंढेंनी यापूर्वी अभिनेत्यांना धाडलेली नोटीस, आता थेट इशाराच; म्हणाले, 'तुम्ही पान किंवा गुटख्याची जाहिरात करत असाल,तर...'

Maharashtra News: राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली भेसळखोर,अस्वच्छ हॉटेल आणि अवैध खाद्य व्यवसाय करणाऱ्यांविरोधात प्रचंड मोठी आणि धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे.
Maharashtra FDA has issued notices to Bollywood actors Shah Rukh Khan, Ajay Devgn and Tiger Shroff over advertisements for a chewing elaichi brand, alleging violations of food safety rules.
Maharashtra FDA has issued notices to Bollywood actors Shah Rukh Khan, Ajay Devgn and Tiger Shroff over advertisements for a chewing elaichi brand, alleging violations of food safety rules.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News: राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली भेसळखोर,अस्वच्छ हॉटेल आणि अवैध खाद्य व्यवसाय करणाऱ्यांविरोधात प्रचंड मोठी आणि धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात FDA यंत्रणा हाय-अलर्ट मोडवर आली असून या कारवायांनी भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. तर दुसरीकडे मुंढेंनी सेलिब्रेटींनाही मोठा दणका दिला होता.

एफडीएनं थेट अभिनेता शाहरुख खान,अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यांनी या तिघांना विमल इलायची प्रचारात सहभागी होणे थांबवण्याचे तसेच त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून जाहिरातीशी संबंधित प्रमोशनल कंटेंट हटवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, तुकाराम मुंढेंनी एनडीटीव्ही युवा या कार्यक्रमात अभिनेत्यांवर केलेल्या कारवाईचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित केला.

तुकाराम मुंढे यांना या कार्यक्रमात अभिनेता शाहरुख खान,अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्याविरोधात कारवाईचा निर्णय घेताना त्यांच्या मनात नेमकं काय होतं? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, विचार अगदी साधा आहे. हा पुन्हा एकदा व्यवस्थेचा भाग म्हणून काम करण्याचाच एक भाग आहे. यानंतर मुंढे यांनी त्यांना अजिबात न आवडणाऱ्या गोष्टींबद्दल भाष्य केले. यामध्ये त्यांनी चापलुसी आणि दुहेरी निकषांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

ते म्हणाले, मला कुणाचीही चापलुसी करायला आवडत नाही. मला चापलुसीचा तिरस्कार आहे. दुहेरी निकष,अनेक प्रकारचे निकष आणि अनेक चेहरे मला आवडत नाहीत. एखाद्या व्यक्तीने आपल्या वैयक्तिक आयुष्यात एक निकष आणि व्यावसायिक आयुष्यात दुसरा निकष ठेवणे योग्य नाही, असंही त्यांनी म्हटलं.

Maharashtra FDA has issued notices to Bollywood actors Shah Rukh Khan, Ajay Devgn and Tiger Shroff over advertisements for a chewing elaichi brand, alleging violations of food safety rules.
Neelam Gorhe News: धक्कादायक! शिवसेना आमदार नीलम गोऱ्हेंच्या घरात पहाटे तीन वाजता घुसखोरी; हातोडा, पकड, दोरीसह तरुणाला पकडलं

एखादी व्यक्ती सार्वजनिकरित्या एखादे उत्पादन चांगले असल्याचे सांगत असेल,तर त्या उत्पादनाचा प्रचार करणाऱ्या व्यक्तीलाही त्याच निकषाने वागता आले पाहिजे. दुसऱ्यांनी ते का पाळावं, असं विचारण्यापेक्षा सुरुवात स्वतःपासून करा, असा मोलाचा सल्लाही आयुक्त तुकाराम मुंढेंनी यावेळी दिला.

ते म्हणाले, तुम्ही पान किंवा गुटख्याची जाहिरात करत असाल, तर आधी स्वतः ते सेवन करा. तुमच्या मुलांनाही ते सेवन करू द्या आणि त्याची सवय लावा. त्यानंतर इतरांना ते करण्यास सांगा. उलट पद्धतीने हे का चालावं? असा खोचक टोलाही मुंढेंनी लगावला.

Maharashtra FDA has issued notices to Bollywood actors Shah Rukh Khan, Ajay Devgn and Tiger Shroff over advertisements for a chewing elaichi brand, alleging violations of food safety rules.
Gokul Election : हसन मुश्रीफांनी गोकुळमध्ये गेम फिरवला; बड्या नेत्यालाच फोडत दिला सतेज पाटलांना धक्का, माजी अध्यक्षाचा इशाराही बेदखल

एखाद्या उत्पादनाची जाहिरात करणे म्हणजे केवळ त्या उत्पादनासाठी आपला चेहरा देणे एवढेच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जाहिरात करणाऱ्या व्यक्तीची जबाबदारीही असते, कारण ती व्यक्ती जनतेला एखादे उत्पादन वापरण्यास किंवा त्यावर विश्वास ठेवण्यास सांगत असते.

तुकाराम मुंढेंनी यावेळी एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री जाहिरातीसाठी केवळ चेहरा असतो आणि उत्पादनाची जबाबदारी उत्पादक किंवा कंपनीची असते, हा युक्तिवाद फेटाळून लावला. जाहिरात करणे हा आपला व्यवसाय आहे, असे सांगून कलाकार किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आपल्या जबाबदारीपासून मुक्त होऊ शकत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Maharashtra FDA has issued notices to Bollywood actors Shah Rukh Khan, Ajay Devgn and Tiger Shroff over advertisements for a chewing elaichi brand, alleging violations of food safety rules.
Satish Chavan news : मराठवाडा पदवीधरचा उमेदवार ठरला? सतीश चव्हाण यांचा प्रचार सुरू, भाजपच्या दाव्याची मात्र वरिष्ठांकडून दखलच नाही...

याबाबत त्यांनी कलाकारांकडून केला जाणारा युक्तिवाद मांडला. मी एक व्यावसायिक व्यक्ती आहे, मी अभिनेता आहे, मी अभिनेत्री आहे, मी कोणीतरी आहे, त्यामुळे मी त्याची जाहिरात करत आहे. ही माझी जबाबदारी नाही, ही केवळ उत्पादकाची जबाबदारी आहे," असा दावा केला जातो. मात्र, "असं नाही, असे मुंढे यांनी स्पष्टपणे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com