Dhananjay Munde : मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चेवर धनंजय मुंडेंचे मोठे विधान; म्हणाले,‘मी राजीनामा...’

Santosh Deshmukh Murder Case : चोहोबाजूंनी होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर मंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबरच मुंडे यांची तब्बल तासभर चर्चा झाली.
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai, 07 January : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी सातत्याने आरोप होत असल्याने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळुंखे यांच्यासह मित्रपक्षाचे आमदार सुरेश धस यांच्याकडूनही मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. सर्वपक्षीय मोर्चातून सातत्याने मुंडे यांच्यावर हल्ले केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा रंगली होती. त्याबाबत खुद्द मुंडे यांनी उत्तर दिले आहे.

संतोष देशमुख (Santosh Deshmukh) खूनप्रकरणामुळे चर्चेत आलेला वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटतर्वीय असून त्याच्या अटकेमुळे मुंडे यांच्यावर आमदार सुरेश धस यांच्याकडून हल्ले केले जात आहेत. संतोष देशमुख खून प्रकरणी बीड, परभणी येथे शांतता मोर्चे काढण्यात आले आहेत. त्या मोर्चात सर्वक्षपीय वक्त्यांचा रोष हा धनंजय मुंडे यांच्यावरच निघताना दिसत आहे.

सर्वपक्षीय नेत्यांनी सोमवारी राज्यपाल रमेश बैस यांना निवेदन देऊन धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनीही मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. याशिवाय समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, अशी मागणी केली आहे.

Dhananjay Munde
Crop Insurance : विमा अधिकाऱ्यांना पाच तास कोंडून ठेवताच, शेतकऱ्यांना आठवड्यातच पैसे देण्याचा शब्द

चोहोबाजूंनी होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर मंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबरच मुंडे यांची तब्बल तासभर चर्चा झाली. त्या भेटीत धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा अजित पवार यांच्याकडे दिल्याची चर्चा आहे. त्या चर्चेवर आता खुद्द धनंजय मुंडे यांनीच भाष्य केले आहे.

Dhananjay Munde
Pune News पुणे विमानतळावर 'या' भाजप नेत्याला अटक; बॅगेत आढळली काडतूसं, दोन मॅगझिन, संभाजी ब्रिगेडचा गंभीर आरोप

मी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही. मी राजीनामा दिला असता तर मंत्रिमंडळाच्या बैठकीला मी कशाला आलो असतो, असे उत्तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे. दरम्यान, जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत राजीमाना देण्याची गरज नाही, अशी भूमिका घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना अभय दिल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com