MLA Disqualification: आमदारांच्या अपात्रतेबाबत महत्त्वाची अपडेट; विधानसभा अध्यक्ष ठाकरे आणि शिंदेना सुनावणीसाठी बोलावणार

Maharashtra Politics Crisis : खरी शिवसेना कुणाची यावर निर्णय होणार
Rahul Narvekar News
Rahul Narvekar NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

MLA Disqualification News Update : आमदार अपात्रतेबाबत राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लवकरच विधीमंडळात खरी शिवसेना कुणाची यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात दोन्ही गटांना सुनावणीसाठी बोलवलं जाणार असल्याची माहिती आहे. राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी आपण लवकरच आमदार अपात्रेसंदर्भात कार्यवाही करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार आता या हालचालींना वेग आला आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाला पत्राद्वारे शिवसेनेच्या घटनेची प्रत मागवण्यात आली आहे. यात शिवसेनेच्या घटनेची प्रत मागवण्यात आली आहे. अपात्र आमदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी बोलवण्यात येणार आहे. तसेच ठाकरे गटालाही तपासणीसाठी बोलण्यात येणार आहे. दोन्ही गटांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाणार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics)

Rahul Narvekar News
Supreme Court Hearing : सुप्रिम कोर्टाचा मोठा निर्णय; आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे

सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे दिले होते. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नेमका काय, कधी आणि कोणत्या आधारावर निर्णय घेतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ''आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेबाबत निर्णय घ्यावा, असं या सुनावणीवेळी न्यायालयाने म्हटलं होतं.

या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कधी घेणार, असा प्रश्न विचारला असता नार्वेकर म्हणाले होते की, हा निर्णय जितक्या लवकर घेता येईल तितका लवकर घेण्याचा प्रयत्न करणार. सर्व घटनात्मक बाबींचा विचार करुन निर्णय़ घेतला जाईल. अपात्रतेच्या निर्णय़ाला किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. जर सर्व नियमाचं पालन करुन निर्णय दिला नाही. तर हा आमदारांवर अन्याय असेल. त्याचाही विचार करणं आवश्यक आहे. (Supreme Court Hearing )

Rahul Narvekar News
Rahul Narevekar on Supreme Court: आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कधी घेणार? नार्वेकरांनी दिलं उत्तर, म्हणाले...

ज्या गटाला तुम्ही राजकीय पक्षाची मान्यता द्याल त्या पक्षाचा व्हिप दुसऱ्या गटाला लागू होणार की नाही. '' व्हिप हा एकाच पक्षाचा असू शकतो. दोन व्हिप असू शकत नाहीत.न्यायालयाने आपल्या निर्णयात सांगितलं आहे की राजकीय पक्षाचा व्हिप लागू होणार. त्यामुळे कोणता गट या पक्षाचं रिप्रेझेंटेशन करतो हे ठरवण आवश्यक आहे. त्या गटाच्या अध्यक्षांनी नेमलेला जो व्हिप असेल, तो व्हिप नेमण्यासंदर्भातील ज्या तरतुदी असतील त्यादृष्टीने व्हिपची नेमला जाईल आणि तो व्हिप विधानसभेच्या सर्व सदस्यांना लागू असेल.' असही नार्वेकरांनी नमुद केलं. (Maharashtra Politics)

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.