No Confidence Motion : काँग्रेसवर तुफान बरसले ज्योतिरादित्य शिंदे; राहुल गांधींवरही कठोर टीका!

Jyotiraditya Shinde On Congress : 1984 च्या शीख दंगलीवर हे लोक गप्प का होते?
Jyotiraditya shinde On Congress :
Jyotiraditya shinde On Congress :Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार विरोधात आणलेल्या अविश्वास ठरावावर तिसऱ्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मणिपूर हिंसाचार हा मुद्दा संसदेत वादळी ठरत आहे. अविश्वास ठरावावर आज मतदान पार पडत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी सरकारचा कस लागणार आहे, दरम्यान सरकारवर विरोधीपक्षांनी केलेल्या टिकेच्या भडीमारानंतर आता केंद्रीय उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Latest Marathi News)

Jyotiraditya shinde On Congress :
Ajit Pawar On PM Post : शरद पवारांना पंतप्रधानपदाची संधी होती पण, काँग्रेसने.. ; अजित पवारांचा सर्वात मोठा खुलासा!

ज्योतिरादित्य शिंदे सभागृहात भाषण करताना म्हणाले, 'मणिपूरमध्ये गेल्या नऊ वर्षांपासून शांतता होती. तुमच्या 10 वर्षांच्या सत्ताकाळाच्या तुलनेत आमच्या नऊ वर्षात एकही हिंसक कारवाया झाल्या नाहीत. जेव्हा आपण दशकभरापूर्वीच्या ईशान्ये भारताबद्दल बोलत होतो, तेव्हा हिंसाचाराचं चित्र असायचे. त्यामागचे कारण असे होते की, तिथे विकास केला तर त्यांच्यात जागृती होईल, असे पूर्वीचे सरकार होते. "

ठदुसरीकडे याउलट पंतप्रधान मोदींच्या काळात आपण मणिपूरमध्ये विकासाची गंगा आणली. त्यांनी विकासाचा मंत्र दिला. मेघालयला पहिल्या रेल्वे स्टेशनसाठी शंभर वर्षे वाट पाहावी लागली नागालँडलाही शंभर वर्षांनंतर दुसरे रेल्वे स्थानक मिळाले, हे मोदी सरकारने केले, असेही शिंदे म्हणाले.

शिंदे पुढे म्हणाले की, "मणिपूरमध्ये जे काही घडत आहे ते निषेधार्ह आहे, पण जेव्हा भारताच्या इतिहासाची काळी पाने उलटली, तेव्हा मला प्रश्न पडतो की, हे लोक (काँग्रेस) 1964 मध्ये बंगालमध्ये झालेल्या दंगलीबद्दल गप्प का होते? 1984 च्या शीख दंगलीवर हे लोक गप्प का होते? असाही सवाल शिंदे यांनी विचारला. "

Jyotiraditya shinde On Congress :
Congress On Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या रुपाने नीरव मोदी भारतातच! अधीर रंजन चौधरींच्या विधानाने भाजप आक्रमक

अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान ज्योतिरादित्य शिंदे यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल केला. तुमच्या सत्ताकाळात मणिपूर 123 दिवस जळत होते. त्यावेळी मणिपूरचे खासदार सभागृहात रडत होते की, राज्य सरकार लाचार आहे, सरकारकडे अतिरेक्यांशी लढण्यासाठी शस्त्रेही नाहीत, अशी याचना ते करत होते," असेही शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.