Shahajibapu Patil
Shahajibapu PatilSarkarnama

Shahajibapu Patil : 'मी गुवाहाटीला जाणार आणि लगेच...', शहाजी पाटलांनी टकमक टोकाची भाषा करणाऱ्या ठाकरेंना दिलं प्रत्युत्तर

Shahajibapu Patil Criticized Uddhav Thackeray : महाविकास आघाडीला बहुमत मिळणार आणि महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार, असा दावा देखील शहाजी पाटील यांनी केला आहे.
Published on

Shahajibapu Patil News : उद्धव ठाकरेंनी सांगोल्याच्या सभेत शहाजी पाटील यांच्यावर टीका करताना त्यांना रेल्वेचे तिकीट काढून द्या त्यांना 23 तारखेनंतर कायमचे गुवाहाटीला जावे लागणार आहे, असा टोला लगावला होता. तसेच या गद्दाराला सांगायचं आहे, तिथला डोंगर तू पाहिलास, पण इथल्या रायगडाचं टकमक टोक नाही पाहिलंस. ते तुला 23 तारखेला दिसणार आहे. त्या टकमक टोकावरुन हे सर्वजण तुझा कसा राजकीय कडेलोट करतील ते बघ, असे म्हटले होते.

उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेला शहाजी पाटील यांनी उत्तर दिले आहे. मी 23 तारखेला गुवाहाटीला जाणार आहे. ट्रेनने नाही तर विमानाने जाणार आहे. कामाख्या देवीचं दर्शन घेऊन लगेच परत येणार आहे. मुख्यमंत्रि‍पदासाठी एकनाथ शिंदे यांना समर्थन देण्यासाठी मी लगेच परत येणार आहे.

Shahajibapu Patil
Supriya Sule : टिंगरेंची नोटीस शरद पवारांनाच; सुळेंनी पत्रकार परिषदेत पुरावाच दिला

'सांगोल्यात उद्धव ठाकरेसाहेब यांनी सभा घेतली. त्यांनी त्यांची पक्षाच्या भविष्याविषयी सांगयला पाहिजे होतं. पण मुख्यमंत्रिपद गेल्यापासून आम्हाला शिव्या दिल्याशिवाय कोणताही अजेंडा त्यांना सांगत नाही.', असा टोला देखील शहाजी पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

महाविकास आघाडीला बहुमत मिळणार आणि महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार, असा दावा देखील शहाजी पाटील यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे म्हणाले,मी प्रकाशआबा साळुंखे यांना तिकीट देणार होतो. पण एक खेकडामधी आला. आणि त्या गद्दाराला तिकीट द्यायला सांगितले. रेल्वेत कुणाची ओळख असेल 23 तारखेचं गुवाहाटीचं तिकीट काढून द्याव. कारण एकाला तिकडे पाठवायचं आहे. मग त्याने तिथे मोजत बसावी झाडं.

Shahajibapu Patil
Ghansawangi Assembly Constituency : लाडकी बहीण योजनेला पैसे कुठून आणणार? म्हणणाऱ्यांनी आमचा जाहीरनामा चोरला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com