Sanjay Gaikwad : आम्हाला विश्वासात न घेतल्यानं रणजीत पाटलांचा पराभव ; शिंदे गट-भाजपमध्ये वादाची पहिली ठिणगी...

Eknath Shinde Group News : रणजित पाटील यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Eknath Shinde Latest Marathi News, Devendra Fadnavis Latest News
Eknath Shinde Latest Marathi News, Devendra Fadnavis Latest News Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Eknath Shinde Group News : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा 5 मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या आहेत, यात भाजपला दोन विद्यमान आमदार गमवावे लागले आहेत. यात अमरावती पदवीधरमधून रणजित पाटील यांचा, तर भाजप पुरस्कृत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांचा पराभव झाला.

राज्यातील भाजपचे 'चाणक्य', उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे दोन टर्म पासून अमरावती पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे डॉ. रणजित पाटील यांचा मविआच्या धीरज लिंगाडे यांनी पराभव केला आहे. रणजित पाटील यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Eknath Shinde Latest Marathi News, Devendra Fadnavis Latest News
IAS Promotion : शिंदे-फडणवीस सरकारनं सहा सनदी अधिकाऱ्यांबाबत घेतला मोठा निर्णय..

धीरज लिंगाडे बुलढाणा जिल्हाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते तर अमरावती पदवीधर मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सुटल्याने काँग्रेस पक्षाने धीरज लिंगाडे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश घेऊन त्यांना उमेदवारी दिली. धीरज लिंगाडे 3 हजार 368 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी एकूण 46 हजार 344 मते मिळवली आहेत.

रणजीत पाटलांच्या पराभवानंतर भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर गंभीर आरोप करण्यात येत आहे. रणजीत पाटलांच्या पराभवावर सध्या भाजप आत्मचिंतन करीत आहेत. अशातच शिंदे गटातील आमदाराने पाटलांच्या पराभवावर प्रतिक्रिया देत घरचा आहेर दिला आहे.

"या निवडणुकीत आमच्या पक्षाचे दोन आमदार असूनही विश्वासात घेतलं गेलं नाही," असा आरोप शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. गायकवाड यांच्या या आरोपांनंतर राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

संजय गायकवाड काय म्हणाले..

  • भाजपने अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिंदे गटाचे दोन आमदार असूनही विश्वासात घेतलं नाही.

  • शिंदे गटाला विश्वासात न घेतल्यामुळे भाजपच्या रणजित पाटील यांचा पराभव झाला.

  • बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार, खासदार आहेत. आम्हा कुणाला विश्वासात घेतलं गेलं नाही.

  • आमच्याकडे एवढी मोठी कार्यकर्त्यांची फळी आहे. पण त्यांना सुद्धा विश्वासात घेतलं गेलं नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.