
Mumbai News: महायुतीत मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळात पडणार याची चर्चा सुरु असताना उपमुख्यमंत्रिपदाबाबतही काही नावे चर्चेत येत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्यानंतर ते सत्तेपासून दूर राहणार असल्याचे समजते. उपमुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांच्याकडून दादा भुसे यांच्या नावाला पसंती दिली असल्याचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे. दादा भुसे हे पाचव्यांदा आमदार झाले आहेत.
महायुतीत घटक पक्षात कुणाच्या वाट्याला किती पदे येणार, याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदावर भाजपने शिक्कामोर्तब केले असले तरी या पदासाठी ओबीसी चेहरा म्हणून विनोद तावडे (Vinod Tawde)यांच्या नावाचीही चर्चा आहे. राष्ट्रीय पातळीवर पक्षात तावडेंनी केलेली कामगिरी उत्तम असल्याने त्यांचा नावाचा विचार सुरु असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे विनोद तावडे यांची उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांच्या केंद्रीय निरीक्षकपदी निवड केली आहे. या निवडीमुळे त्यांच्या गळ्यात राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ पडणार असल्याचं बोललं जात आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने नव्या सरकारमध्ये ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रिपदाची मागणी केली आहे. राष्ट्रवादीच्या विद्यमान मंत्र्यांपैकी ७ जणांना पुन्हा संधी मिळणार असून युवा चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांची दिली.
एकनाथ शिंदे. अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे आज दिल्ली दौऱ्यावर असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत राज्यातील मंत्रिमंडळावर ते चर्चा करणार आहेत. कोण मुख्यमंत्री होणार, कुणाला कोणते खाते मिळणार हे दिल्लीमध्ये ठरणार आहे.
शपथविधी कधी होणार याबाबत युतीतील तिन्ही पक्षांचे नेते दिल्लीत अमित शहांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती आहे. भेटीत महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरणार असल्याचं समजते.
काल (बुधवारी) रात्री उशिरा विनोद तावडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास ३५-४० मिनिटे चर्चा झाली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शहा आणि तावडे यांच्या भेटीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
उपमुख्यमंत्रिपदी भुसे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने मालेगाव शहर व परिसरात शिवसैनिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. भुसे यांना या पदावर संधी मिळाल्यास उत्तर महाराष्ट्राला न्याय मिळून विकासाची प्रक्रिया आणखी गतिमान होईल, असे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील देवरे व महानगरप्रमुख विनोद वाघ यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.