Maharashtra Government : धक्कादायक : नवीन उत्पन्न, रहिवास दाखल्यांबाबत अधिकारीच अंधारात; सरकारला खडबडून जाग, पुन्हा काढावा लागला आदेश...

Maharashtra govt order : संबंधित सेवांसाठी आवश्यक असलेल्या अर्जातील बदल आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
Maharashtra government Devendra Fadnavis
Maharashtra government Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra latest News : राज्य सरकारने महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध प्रकारचे दाखले व विविध प्रकारच्या सेवांसाठी नवीन संकल्पनेचा वापर करून सुलभता आणली आहे. हे दाखले व प्रमाणपत्रांच्या रचनेमध्ये बदल करण्यात आले आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी सुधारित नमुना करण्यात आला आहे. मात्र, याबाबत महसुल विभागातील अधिकारी, कर्मचारीच अंधारत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महसूल विभागाने सोमवारी काढलेल्या शासन निर्णयातून ही बाब समोर आली आहे. सुधारित नमुन्यांबाबत क्षेत्रीय शासकीय कार्यालये अवघत नसल्याने नागरिकांना शासकीय लाभांपासून वंचित राहावे लागत असल्याची समस्या उपस्थित झाली आहे, असे या शासन निर्णयात म्हटले आहे. आजच्या शासन निर्णयासोबत सरकारने हे नमुनेही जोडले आहेत.

प्रामुख्याने विविध कारणांसाठी द्यावे लागणारे शपथपत्र, वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र, रहिवास दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र आणि अल्प भूधारक प्रमाणपत्र यांच्या सुधारित नमुन्यांबाबत जिल्हा, तालुका स्तरावरील प्रशासन अनभिज्ञ आहे. याबाबत सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट सुचना दिल्या आहेत.

Maharashtra government Devendra Fadnavis
Women reservation : महिला आरक्षणावरून CM फडणवीसांची मोठी घोषणा; महाराष्ट्रातील 1 कोटी महिलांपर्यंत पोहोचणार

संबंधित सेवांसाठी आवश्यक असलेल्या अर्जातील बदल आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संबंधित दाखल सरकारने ३० मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांत सुधारित नमुन्यांत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी करावे लागणारे अर्ज, प्रतिज्ञापत्रे, निर्गमित करावयाचे दाखले व त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे७ी पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

Maharashtra government Devendra Fadnavis
PM Narendra Modi ultimatum : शेवटची संधी, 29 एप्रिलआधी जवळच्या पोलीस ठाण्यात शरण या! PM मोदींचा कुणाला अल्टीमेटम?

प्रमाणपत्रांच्या नमुन्यात सुधारणा करण्यात आलेली बाबत विविध प्रशासकीय विभागांच्या क्षेत्रीय शासकीय कार्यालयास माहिती नसल्याने नव्या स्वरुपातील प्रमाणपत्रे काही ठिकाणी स्वीकारण्यात येत नाहीत. त्यामुळे सरकारने आता सर्व मंत्रालयीन विभागांना सक्त सुचना दिल्या आहेत. सर्व मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या अधिपत्याखालील सर्व क्षेत्रिय कार्यालयांना प्रमाणपत्रांच्या मसुद्यात सुधारणा करण्यात आल्याची बाब निदर्शनास आणून देण्यास सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com