Maratha Reservation News : उपोषण मागे घ्या ! मुख्यमंत्र्यांची जरांगे पाटलांना फोनवरून विनंती ; जरांगे म्हणाले, 'मी पाणी पितो, तुम्ही.. '

Eknath Shinde News : "मी पाणी पितो, तुम्ही जीआर घेऊन या,"
Maratha Reservation News
Maratha Reservation NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalna : मनोज जरांगे पाटील सात दिवसापासून मराठा आरक्षणासाठी उपोषण करीत आहेत. त्यांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश घेऊन शिवसेना नेते, अर्जुन खोतकर हे जरांगे पाटलांच्या भेटीसाठी आले होते.

मराठा आरक्षणाबाबतचा मसुदा खोतकरांनी जरांगेंना दाखवली. पण "मी पाणी पितो, तुम्ही जीआर घेऊन या," असे जरांगेंनी खोतकरांना सांगितले. मुख्यमंत्री आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचे खोतकरांनी सांगितले. जरांगेच्या प्रकृतीबाबत मुख्यमंत्री सतत चौकशी करीत आहेत, असे खोतकरांनी सांगितले. (Latest Marathi News)

Maratha Reservation News
Jalna Maratha Andolan : भाजप नेत्यांच्या शिष्टाईवर दानवेंचे दोन शब्दातच उत्तर ; म्हणाले, "भाजपा नेत्यांची.."

खोतकर म्हणाले, " मराठा आरक्षणाचा जीआर कोर्टात टिकावा अशा पद्धतीने काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, त्याआधी परिपूर्ण चर्चा होण्याची आवश्यकता आहे. जरांगे पाटील यांनी आता उपोषण मागे घेऊन चर्चेची दारे उघडी करावीत,"

Maratha Reservation News
Maratha Reservation News : मराठा मोर्चातून काँग्रेस आमदारांना बाहेर काढले ; हंबर्डे, राजूरकरांवर मराठा युवक संतापले..

आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक सह्याद्री अतिथी गृहात झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाराज, खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.यात फडणवीसांनी लाठीमारांचे समर्थन करणार नाही, असे सांगितले. “जालन्यातील घटना ही चुकीची असून यात निष्पाप नागरिकांवर जो बळाचा वापर झाल्याने जी इजा झाली. त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो. या प्रकरणाची मुख्यमंत्री ही उच्चस्तरीय चौकशी करणार आहेत. दोषींवर कारवाई देखील करण्यात येणार आहे," असे फडणवीस म्हणाले.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com