Maharashtra Monsoon Session LIVE : बोगस बियाणे यावरून सत्ताधारी-विरोधक आमने सामने ; विरोधकांचा सभात्याग

Monsoon Adhiveshan 2023 : खतांच्या दरात वाढ झालेली नाही, अशी माहिती मुंडेंनी सभागृहाला दिली.
Monsoon Session
Monsoon SessionSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Monsoon Session 2023 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज (बुधवारी) तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून बोगस बियांणे प्रकरणावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. आज सभागृहात पुन्हा या मुद्यांवरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, नाना पटोले आदींनी राज्याच्या कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. बोगस बियाणे विक्रीप्रकरणी किती जणांवर कारवाई झाली, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला. "बोगस बियाणे प्रकरणी राज्यभरात हप्तेखोरांच्या टोळ्या फिरत आहे," असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. खतांमध्ये केंद्र सरकारकडून नफेखोरी होत असल्याचा आरोप थोरातांनी यावेळी केला.

Monsoon Session
Somaiya Viral Video Case: : सोमय्यांमुळे त्रास झाला, तरीही बाबा, त्यांच्या हक्कासांठी तुम्ही उभे राहिलात ; नताशाचं Tweet व्हायरल..

"अनेक बँकेनी शेतकऱ्यांनी कर्ज दिले नाही," असा आरोप नाना पटोले यांनी केला. त्यावर राज्यभरात कोट्यवधीचं कर्जवाटप करण्यात आले, असे मुंडे यांनी सांगितले. पटोलेंनी केलेल्या आरोपांवर मुंडेंनी स्पष्टीकरण दिले. बोगस बियाणं प्रकरणावर जरब बसवू, असे मुंडे म्हणाले. या विषयावर चर्चा सुरु असताना विरोधकांनी सभात्याग केला. बोगस बियाणांवर नियंत्रण आणणार, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Monsoon Session
BJP News : पुणे ग्रामीण बारामती शहराध्यपदी वासुदेव काळे, तर पुणे मावळ शहराध्यपदी शरद बुट्टे पाटील यांची नियुक्ती

"काही ठिकाणी शेतकऱ्यांना बोगस बियाणे व खतांची विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. सरकारने अशा विक्रेत्यांना, कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. बीटी बियाण्यांसदर्भात जसा कायदा आहे. तसाच कायदा बोगस बियाणांसदर्भात करण्यात येईल. तसेच, केंद्र सरकारने खतांच्या अनुदानात कपात केली आहे. मात्र, यामुळे खतांच्या दरात वाढ झालेली नाही, अशी माहिती मुंडेंनी सभागृहाला दिली.

किरीट सोमय्यांविरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओप्रकरणी किरीट सोमय्यांवर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली. या आंदोलनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस नेते भाई जगताप यांच्यासह महाविकास आघाडीचे आमदार उपस्थित होते.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com