MPSCच्या अध्यक्षांचा राजीनामा होणार का? मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना पाठवलं पत्र

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा यामागणीसाठी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन सुरु आहे.
CM Devendra Fadnavis_MPSC Chief Vivek Bhimnawar
CM Devendra Fadnavis_MPSC Chief Vivek Bhimnawar
Published on: 
Updated on: 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा यामागणीसाठी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतरही विद्यार्थी अध्यक्षांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत.

यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचं पाऊल टाकलं असून राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांना एक पत्र लिहिलं असून यामध्ये एमपीएससीच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईबाबत शिफारस केली आहे. पण याच्या कार्यपद्धतीचाही उल्लेख त्यांनी या पत्रात केला आहे. त्यामुळं आता विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आयोगाचे अध्यक्ष पायउतार होणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय शिफारस केलीए?

मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडं शिफारस केली की, एमपीएससीचे माजी आणि सध्याचे अध्यक्ष तसंच सदस्य यांच्याविरोधात घटनेच्या कलम ३१७ नुसार कारवाईसाठी एका समितीची नेमणूक करण्यात यावी. हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमून याबाबतचा अहवाल तीन महिन्यात मागवण्यात यावा. या अहवालाच्या निष्कर्षानुसार, पुढील कारवाई करण्यात यावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडं केली आहे.

CM Devendra Fadnavis_MPSC Chief Vivek Bhimnawar
Rajya Sabha Candidate : वडील भाजपच्या पाठिंब्यावर खासदार, आता लेकाला काँग्रेसच्या मित्रपक्षाकडून तिकीट; 'NDA'ची कोंडी

दरम्यान, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं जे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांन भेटलं होतं त्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी आयोगाच्या अध्यक्षांवर कारवाईबाबत अशा समितीबाबत आश्वासन दिलं होतं. त्यानुसार, त्यांनी आता राज्यपालाकडं याबाबत शिफारस केली आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनुसार जर राज्यापलांनी तातडीनं चौकशी समिती नेमली तरी तीन महिन्यानंतर त्याचा अहवाल आल्यानंतरच अध्यक्षांवर कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळं तोपर्यंत आंदोलनकर्ते विद्यार्थी काय भूमिका घेतात याकडं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com