BJP Mumbai : भाजपचा दक्षिण मुंबईसाठी 'मास्टरस्ट्रोक'! आशिष शेलार, अमित साटम यांच्या विश्वासू शिलेदाराकडे दक्षिण मुंबईची धुरा!

Murugan Selvan appointment News : भाजपने दक्षिण मुंबईसाठी मोठे प्लॅनींग केले आहे. याठिकाणी मंत्री आशिष शेलार, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या विश्वासू शिलेदार असलेल्या नेत्याकडे दक्षिण मुंबईची धुरा सोपवली आहे.
ashish shelar, amit satam
ashish shelar, amit satamSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबईतील महापालिका निवडणुकीत मोठे यश मिळवल्याने भाजपचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. आगामी काळात लवकरच मोठ्या निवडणुका होणार नसल्या तरी तीन वर्षानंतर होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी भाजपने दक्षिण मुंबईसाठी मोठे प्लॅनींग केले आहे. याठिकाणी मंत्री आशिष शेलार, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या विश्वासू शिलेदार असलेल्या नेत्याकडे दक्षिण मुंबईची धुरा सोपवली आहे. उद्योगपती असलेल्या व तामिळनाडूचे रहिवासी असलेल्या या नेत्याची नियुक्ती अमित साटम यांनी केली. दरम्यान, या नियुक्तीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

भाजपच्या (BJP) मुंबई विभागात नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाने मुरूगन सेल्वन यांची भाजपच्या मुंबई दक्षिण विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मुरूगन यांच्यवर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. मुरूगन हे मूळचे तामिळनाडूचे रहिवासी असून ते सध्या मुंबईत राहतात.

ashish shelar, amit satam
Maharashtra Breaking News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यात साप निघाल्यानं उडाली तारांबळ

उद्योगपती मुरूगन यांची नियुक्ती मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी केली. दरम्यान, सेलवन यांच्या नियक्तीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. भाजपने नियुक्ती केल्यानंतर मुरूगन सेल्वन यांनी भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar), तसच मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची भेट घेतली. यावेळी शेलार आणि साटम यांनी मुरूगन यांना शुभेच्छा दिल्या. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील तमिळ समाजाच्या विविध उपक्रमांत मुरूगन यांनी सक्रियपणे सहभाग नोंदवला आहे.

ashish shelar, amit satam
Mahayuti power sharing dispute: महायुतीमध्ये धडधड वाढली! एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीला रवाना; शिवसेना नाराज?

शेलार, साटम यांच्याशी जवळचे संबंध

मुरूगन यांनी या परिसरात भाजपला बळकटी देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे, मुंबईतील तमिळ संस्थांचे आणि भाजप नेतृत्वाचे दुवा म्हणून त्यांनी सातत्याने कामकाज पाहिले आहे. आशिष शेलार आणि अमित साटम यांसारख्या प्रमुख नेत्यांशी त्यांचे जवळचे राजकीय संबंध राहिले आहेत. त्यामुळेच मुरूगन यांच्यवर विश्वास दाखवत मोती जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

ashish shelar, amit satam
Panchayat Samiti politics: सत्तास्थापनेवरून महायुतीत 'महाभारत'! 24 तासांत भाजपला 3 मोठे धक्के; विरोधात मित्रपक्षांनीच शड्डू ठोकला!

दक्षिण मुंबई हा भाजपसाठी अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा विभाग आहे. कुलाबा ते वरळीपर्यंतच्या पट्ट्यात भाजपचे वर्चस्व वाढवण्यासाठी एका तरुण आणि अभ्यासू चेहऱ्याची गरज होती, त्यामुळे याठिकाणी भाजपने मुरूगन सेल्वन यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

ashish shelar, amit satam
Top 10 News : बारामतीमध्ये पोटनिवडणूक, बीड हादरले,महिलेवर अत्याचार, प्राजक्त तनपुरे निवडणुकीच्या मैदानात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com