Mumbai Manhole Death: मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू प्रकरणी महापौरांची मोठी कारवाई; आयुक्त अश्विनी भिडेही म्हणाल्या, हे गंभीर पण...

Mumbai Manhole Death: मुंबईतील साकीनाका-खैरनी रस्त्यावर असलेल्या एका झाकण नसलेल्या गटारात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
Ritu Tawade_BMC Mayor
Ritu Tawade_BMC Mayor
Published on
Updated on

Mumbai Manhole Death: मुंबईतील साकीनाका-खैरनी रस्त्यावर असलेल्या एका झाकण नसलेल्या गटारात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी महापौर रितू तावडे यांनी मोठी कारवाई केली असून आयुक्त अश्विनी भिडे यांनी देखील ही दुर्घटना अत्यंत गंभीर असल्याचं सांगत मुंबईतील गटारांच्या कामकांचा आढावा घेतला.

Ritu Tawade_BMC Mayor
Devendra Fadnavis : 'कॉन्फिडन्स संपला की पक्षही संपतो'! ठाकरेंचे सहा खासदार फुटण्यामागे CM फडणवीसांनी सांगितलं निधीपेक्षाही मोठं कारण

मुंबईतील झाकण नसलेल्या गटारातून पडून मृत्यू झालेला नागरिकाचं नाव अस्लम शेख असून हा साधारण ४५ वर्षाचा असून तो फोनवर बोलत रस्त्यानं चालला होता. त्याचवेळी ठेकेदाराकडून गटारांच्या देखभालीसाठी त्याचं झाकण काढून काम सुरु होतं. संबंधित व्यक्ती फोनवर बोलत चालत असताना त्याला हे गटार दिसलं नाही आणि तो थेट त्या गटारातच पडला. हे गटार खोल असल्यानं आणि खालून मोठी आकाराची मलनिस्सारवाहिनी जात असल्यानं या व्यक्तीचा मृतदेह २० फूट अंतरावर बचाव पथकाला आढळून आला. पण यामुळं प्रशासनाचा निष्काळजीपणा कसा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर बेततो आहे, हे यातून स्पष्ट झालं आहे.

Ritu Tawade_BMC Mayor
RTI Act: माहिती अधिकार कायद्यातील बदलांना अखेर स्थगिती! कार्यकर्त्यांना मोठा दिलासा; हजारेंची मध्यस्थी ठरली यशस्वी, मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलं?

चार अधिकाऱ्यांना केलं निलंबित

हा प्रश्न गंभीर असल्यानं आणि माध्यमांनी त्याची मोठी दखल घेतल्यानं महापौर रितू तावडे यांनी तातडीनं घटनास्थळी भेट देत याप्रकरणी कारवाई केल्याचं सांगितलं. या संपूर्ण घटनेबाबत बोलताना तावडे यांनी सांगितलं की, "या प्रकरणी आम्ही कोणालाही पाठीशी घालण्याचं काम केलेलं नाही, तात्काळ याला जबाबदार असलेल्या चार अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. दोन वर्षांपूर्वी या गटारांच्या देखभालीचं टेंडर निघालेलं होतं. त्यावेळी सांगितलं गेलं होतं की, या गटारांवर जाळ्या घातल्या जाव्यात. साडेचार वर्षात प्रशासकीय काळात जे काही झालं आहे, ते निस्तारण्याचं काम आम्ही करतो आहोत. वारंवार आम्ही बैठका घेऊन आम्ही रस्त्यावर उतरुन प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी काम करतो आहोत. दोन वर्षांपूर्वीच जर टेंडर होतं तर ते काम अद्याप का झालेलं नाही, हा प्रश्न मी प्रशासनाला विचारणार आहे"

आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रशासनाची भूमिके केली स्पष्ट

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी देखील या दुर्घटनेवर प्रशासनाची भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटलं की, यापूर्वीच्या दुर्घटनांचा आढावा घेऊन मुंबईत सर्व मॅनहोल्सवर जाळी भरवण्यासाठी मोठा प्रयत्न केलेला आहे. मुंबईतली मॅनहोल्स बघितली तर १ लाख ३,९२६ इतकी मॅनहोल्स आहेत. या सर्व मॅनहोल्सवर ९६,३८३ मॅनहोल्सवरची जाळी बसवण्यात आली आहे. सध्याची घटना ही एल वॉर्डमध्ये घडली आहे. या वॉर्डमध्ये काही दिवसांपूर्वी ७५ मॅनहोल्सवरील जाळ्या लावायच्या बाकी होत्या. ताज्या अहवालानुसार, केवळ ४ मॅनहोल्सवरच जाळ्या बाकी होत्या आणि तेच काम सुरु असताना ही घटना घडली. हे काम करत असताना त्या कंत्राटदारानं, कामगारांनी आणि तिथल्या सुपरव्हायझरनं त्याला पुरेशी सुरक्षेची काळजी घ्यायला हवी होती. तिथं बॅरिकेट करायला पाहिजे होतं, ट्रायपॉड ठेवायला हवं होतं. तिथं दोन माणसं उभी केली होती, ते पादचाऱ्यांना सुचना देत असतील पण घाईन चालणाऱे सगळेजण सूचना समजून घेऊ शकत नाहीत. हीच काळजी न घेतल्यामुळं ही दुर्घटना घडली, त्यामुळं ही अतिशय गंभीर घटना आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com