Bmc Election : मुंबई महापालिकेत दबाव वाढवण्यासाठी मास्टरस्ट्रोक: एकमेकांच्या विरोधात लढलेले तीन पक्ष येणार एकत्र

Mumbai municipal election News : मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत निवडणुक लढलेली शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीनंतर मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
Sharad Pawar| Ajit Pawar
Sharad Pawar| Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील महापालिका निवडणुकीचा धुरळा बसला असला तरी आता सर्वच पक्षांचे महापौर निवडीकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे सर्वचजण तयारी करीत असताना मुंबईतील राजखीय घडामोडीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत निवडणुक लढलेली शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीनंतर मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

येत्या काळात मुंबई महापालिकेत एकमेकांच्या विरोधात लढलेल्या दोन राष्ट्रवादी निवडणुकांनंतर एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासोबतच या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले तीन पक्ष एकत्र येणार असल्याचे समजते. नव्याने गट नोंदणी करण्याचा प्रयत्न या तीन पक्षांच्या नगरसेवकांनी सुरु केले आहेत. या तीन पक्षांची आघाडी स्थापन झाल्यास या गटाला स्थायी समितीमध्ये, सुधार समितीमध्ये शिक्षण समितीमध्ये जागा मिळू शकते. त्यामुळे हालचालींना वेग आला आहे.

Sharad Pawar| Ajit Pawar
BJP news : संभाजीनगरमध्ये भाजपचे जोरदार 'शक्तिप्रदर्शन'; नवनिर्वाचित 57 नगरसेवकांसह अतुल सावे गणरायाच्या चरणी नतमस्तक!

राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला असतानाच मुंबई महापालिकेत एकमेकांच्या विरोधात लढलेल्या दोन राष्ट्रवादी निवडणुकांनंतर एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 शरद पवार राष्ट्रवादीचा 1 आणि समाजवादी पक्षाचे 2 नगरसेवक मिळून 6 जणांची एक नवी आघाडी तयार करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

Sharad Pawar| Ajit Pawar
Shivsena vs BJP : बंडखोर नेत्याला एकनाथ शिंदेंकडून पुन्हा 'चान्स'; थेट जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती : भाजपच्या नेत्यांमध्ये शिवसेनेविरोधात असंतोष

येत्या काळात अशास्वारीरूपाची आघाडी स्थापन केल्यास या गटाला स्थायी समितीमध्ये १ जागा, सुधार समितीमध्ये १ शिक्षण समितीमध्ये १ जागा मिळू शकते. या शिवाय इतर छोट्या समितींमध्ये जागा मिळू शकते. कोणत्याही पेचप्रसंगात मतदानाची वेळ आली तर हे सहा जणांनी कुणाला मतदान करायचे हे सुद्धा ठरविले जाऊ शकते. पण त्यामुळे मुंबईतही दोन राष्ट्रवादी एकत्रित यायला सुरूवात झाली असल्याची चर्चा रंगली आहे.

Sharad Pawar| Ajit Pawar
BJP Vs NCP : शरद पवारांचा पक्ष 2 तालुक्यातून संपल्यात जमा : साताऱ्यातील 2 दिग्गज नेत्यांचा भाजप प्रवेश; गोरेंकडून मकरंदआबांची कोंडी

मुंबईतील महापौरपदाचे आरक्षण जुन्या चक्राकार पद्धतीने झाल्यास एसटी प्रवर्गसाठी महापौरपद आरक्षित होण्याची शक्यता जास्त आहे. परंतु नगरसेवक आरक्षणपद्धत जशी नव्याने काढली होती. त्या पद्धतीने महापौर आरक्षणही नव्याने काढले जाणार आहे. जी चक्राकार आरक्षण पद्धतीची सुरूवात समजली जाणार आहे.

Sharad Pawar| Ajit Pawar
Latur Congress: लातूर महापालिकेत विजयाचा झेंडा, काँग्रेसचा कॉन्फिडन्स वाढला; जिल्हा परिषदेसाठी स्वबळाची चाचपणी? भाजपची काय भूमिका?

दरम्यान, येत्या काळात मुंबई महापालिकेचे महापौरपद एसटी प्रवर्गासाठी राखीव होणार असल्याच्या चर्चेने सत्ताधारी पक्षांकडून दोन नगरसेवकांवर दबाव आणला जात असल्याची ठाकरे गटाकडून माहिती देण्यात आली. शिवसेना ठाकरेंकडे प्रियदर्शिनी ठाकरे आणि जितेंद्र वळवी हे एसटी प्रवर्गातील नगरसेवक आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडूनही या दोन्ही नगरसेवकांची विशेष काळजी घेतली जात आहे.

Sharad Pawar| Ajit Pawar
NCP Unity Talks : महापालिका निवडणुकीत 'पानिपत', आता जिल्हा परिषदेला दोन्ही राष्ट्रवादी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारीला

सर्व 29 महानगरपालिकामधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारी रोजी काढली जाणार आहे. 22 जानेवारीला सकाळी 11 वाजता सर्व महापालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रवर्गाचा महापौर कोणत्या नगरपालिकेमध्ये बसणार हे 22 जानेवारीला निश्चित होईल. नगरविकास विभागाकडून महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत मंत्रालयात काढली जाईल.

Sharad Pawar| Ajit Pawar
BJP News: भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांचा पहिलाच धडाकेबाज निर्णय; महाराष्ट्राच्या दोन 'गेमचेंजर' नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com