Maharashtra Politic's : आता तडजोड नाहीच...विधान परिषदेच्या 7 जागा हव्यात : शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेने महायुतीत पेच

Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत तणाव वाढला असून शिवसेनेने सात जागांवर ठाम भूमिका घेतल्याने भाजप-शिवसेना संघर्ष तीव्र झाला आहे.
Sunetra Pawar-Eknath Shinde- Devendra Fadnavis
Sunetra Pawar-Eknath Shinde- Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 22 May : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून विधान परिषदेच्या १७ जागांची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यात एक जागेची पोटनिवडणुकीचा समावेश आहे. विधान परिषदेच्या जागा वाटपांवरून सध्या महायुतीमध्ये वाद रंगला आहे. भाजपने स्वतःसाठी १२ जागा, शिवसेनेला तीन, तर राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा देण्याचा फार्म्युला ठरवला आहे. मात्र, शिवसेना सात जागांवर ठाम असून या जागांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे महायुतीत विधान परिषदेच्या जागा वाटपावरून पेच निर्माण झाला आहे.

विधान परिषदेच्या १७ जागांपैकी भारतीय जनता पक्ष १२ जागांवर ठाम आहे, तर शिवसेनला तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा देण्यावर ठाम असल्याचे सांगितले जात आहे. पण शिवसेना सात जागांसाठी आक्रमक झाली आहे. आमच्या पूर्वी पाच जागा होत्या, त्या दोन जागा वाढवून मागत आहोत आणि आम्ही सात जागांवर ठाम आहोत, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आलेला आहे.

आम्हाला सात जागा मिळाव्यात, अशी मागणी शिवसेनेकडून भाजपकडे करण्यात आली होती. पण भाजपकडून त्यास प्रतिसाद मिळाला नाही. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या वेळी कमी जागा घेऊन तडजोड केली. मात्र आता आम्हाला सात जागा मिळायलाच हव्यात, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली आहे. त्यामुळे महायुतीत मोठा पेच निर्माण झाला आहे.

शिवसेनेच्या ताठर भूमिकेपुढे भाजपने माघार न घेता शिवसेनेला ३ ते ४ जागा देण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. शिवसेनेचे अगोदरच पाच आमदार होते, त्यात आणखी दोन जागा मिळाव्यात, अशी मागणी भाजपकडे करण्यात आली होती. पण भाजपने कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. भाजपकडून ३ ते ४ जागाच देण्याचे तोंडी कळविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता शिंदेसेना भाजपला वाकवणार की पुन्हा एकदा शिंदे यांना माघार घ्यावी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sunetra Pawar-Eknath Shinde- Devendra Fadnavis
Dilip Mohite : ‘मला पाडण्यात अन्‌ तिकिट कापण्यात तुमची भूमिका...आता जे होईल ते होईल, कोणतीही किमत मोजायची तयारी...'

एका जागेवर पोटनिवडणूक

विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक, तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राजीनामा दिलेल्या एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. बानकुळे यांच्या जागेवर निवडून येणाऱ्याला सुमारे दीड वर्षांचा कालावधी मिळणार आहे, इतर १६ जणांना सहा वर्षांचा कालावधी मिळणार आहे. या १७ जागांसाठी १८ जून रोजी मतदान होणार असून २२ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे.

आधीचे आमदार आणि पक्ष

पुणे : अनिल भोसले (राष्ट्रवादी)

सोलापूर : प्रशांत परिचारक, (भाजप)

सांगली-सातारा : मोहनराव कदम (काँग्रेस)

अहिल्यानगर : अरुण जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस)

नाशिक : नरेंद्र दराडे (शिवसेना)

ठाणे : रवींद्र फाटक (शिवसेना)

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)

Sunetra Pawar-Eknath Shinde- Devendra Fadnavis
Rajendra Raut : राजेंद्र राऊतांचा 5 दिवसांपासून मुंबईत मुक्काम : मुख्यमंत्र्यांसह 3 बड्या नेत्यांची घेतली भेट; बार्शीत 'फिक्स आमदारकी'चे मेसेज व्हायरल

जळगाव चंदूभाई पटेल (भाजप)

नांदेड : अमर राजूरकर (काँग्रेस)

यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना)

भंडारा-गोंदिया : परिणय फुके (भाजप)

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : रामदास आंबटकर (भाजप)

अमरावती : प्रवीण पोटे (भाजप)

धाराशिव-लातूर-बीड : सुरेश धस (भाजप),

परभणी-हिंगोली: विप्लव बाजोरिया (शिवसेना)

छत्रपती संभाजीनगर-जालना : अंबादास दानवे (शिवसेना)

नागपूर: चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com