

Thane News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माणुसकीचा आणि संवेदनशीलतेचा अनेकदा प्रत्यय विविध घटनांमधून येत असतो. एकनाथ शिंदे हे शुक्रवारी (ता.25)पुन्हा एकदा प्रसंगावधानता दाखवत माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी जपताना दिसून आले. त्यांच्या तत्परतेमुळे कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा जीव वाचला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यामध्ये वाहतूक पोलीस निरीक्षक संजय नलावडे हे ड्युटीवर होते. ते सकाळपासूनच उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात कर्तव्य बजावत होते. सकाळी ठाण्यातील टेंभी नाका येथील आई दुर्गेश्वरीचे मंडप पूजन करून उपमुख्यमंत्री शिंदे हे पुण्याला अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी गणपती दर्शनासाठी रवाना होणार होते.
पुण्याला जाण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील नियोजित कार्यक्रम आटोपून हेलिकॉप्टरद्वारे रवाना झाले. अभिनेते नाना पाटेकर यांच्याकडे जाऊन ते पुढील कार्यक्रमासाठी पुन्हा ठाण्यातील त्याच हेलिपॅडवर लँड होत असताना त्यांच्या ताफ्यात कर्तव्य बजावत असलेल्या संजय नलावडे यांना अचानक चक्कर आली अन् ते धाडकन खाली कोसळले.
एकनाथ शिंदेंच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ते हेलिकॉप्टरमधून उतरले. त्यांनी पोलिस अधिकारी नलावडे यांच्याकडे धाव घेतली.तोपर्यंत उपस्थित काही सहकाऱ्यांनी त्यांना रुग्णवाहिकेत दाखल केले होते. शिंदेंनी ही रुग्णवाहिका ज्युपिटर रुग्णालयात नेण्याचे आदेश दिले.
विशेष म्हणजे एवढ्यावरच न थांबता शिंदेंनी स्वतः ही रुग्णवाहिका आपल्या गाडीच्या पुढे ताफ्यातून ज्युपिटर रुग्णालयापर्यंत पोहोचवली. तसेच शिंदेंनी रुग्णालयात पोहोचवल्यावर संबंधित डॉक्टरांची भेट घेतली.
तसेच त्यांना तातडीने उपचार सुरू करण्यास सांगितले. यावेळी शिंदेंनी डॉक्टरांना नलावडे यांच्यावरील उपचारात कोणतीही कसर न सोडण्यास सांगितले. खर्चाची काळजी करू नका असे स्पष्ट निर्देश रुग्णालय प्रशासनाला दिले.
मुंबई, पुणे यांसह राज्यभरात सर्वच ठिकाणी अनंत चतुर्दशीच्या दिवशी पोलिस प्रशासनावर कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रचंड ताण असतो. त्यातच नेतेमंडळी यांचे धावपळीचे दौरे ठरलेले असतात. वाहतूक पोलीस निरीक्षक संजय नलावडे हे सकाळपासूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यात ड्युटीला होते.त्याचदरम्यान ही घटना घडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.