
Pravin Darekar: मराठी विजयी मेळाव्याकडं अवघ्या महाराष्ट्राचं आज लक्ष लागून राहिलं होतं. ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यामुळं याची मोठी चर्चा झाली, गर्दीही झाली आणि दोघांची भाषणंही झाली. पण आता त्यांच्या भाषणांची महायुतीच्या नेत्यांकडून विश्लेषणं करण्यात येत आहेत. यामध्ये राज ठाकरेंचे जुने शिलेदार जे सध्या भाजपत आहेत, त्यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचं कौतुक केलं आहे. हे नेते म्हणजे आमदार प्रवीण दरेकर आहेत. कौतुकाबरोबरच त्यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीकाही केली.
दरेकर म्हणाले, आजच्या मेळाव्यात राज ठाकरे मराठीचं महत्व सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्यावर केलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण देऊन एकजुटीचं आवाहन करत होते. तर दुसरीकडं उद्धव ठाकरेंच्या बोलण्यामध्ये मळमळच जास्त दिसत होती. ठाकरेंनी फडणवीसांचे उपकार लक्षात ठेवावेत, आपण कोटी केली असेल तर मी समजू शकतो. पण हे सकारात्मक घ्या नाहीतर बोलायचं मराठी माणसाच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि मदत करायची दुसऱ्यांना. मी तर तिथूनच आलोय त्यामुळं मी जर अनेक गोष्टी बोललो तर जागा राहणार नाही. मुंबई महापालिकेत सत्ता असताना कोण कंत्राटदार मोठे झाले त्यात किती लोक मराठी होते. मराठीला पायघड्या घालताना किती मराठी बिल्डरांना ताकद दिली गेली.
मराठी व्यवसायिक उद्ध्वस्त असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याचना करताना पण देशोधडीला लागले. मी नावासहित याठिकाणी सांगेन, पण मला व्यक्तीशः काही सांगायचं नाही. सत्तेत नसलो तरी मराठी माणसाच्या हितासाठी आपल्याला आपल्याला समर्थन देईल. कारण मराठी भाषा, मराठी अस्मिता असेल भाजपनं नेहमी भूमिका घेतलेली आहे. मराठी माणसाला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मागणी अनेक वर्षे होत होती. पण ही मागणी लावून धरण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहानाचं झाली. त्यानंतर पंतप्रधानांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठी भाषा भवन उभं राहू शकलं नाही. ते राहिलं असतं तर त्यात बोलायला काही शिल्लक राहिलं आहे.
मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत बोलताना दरेकर म्हणाले, "मला राज ठाकरेंच्या भाषणात अशा प्रकारचं एकही वाक्य दिसलं नाही, उलट उद्धव ठाकरे हे अत्यंत अगतिक झाल्याचे दिसले. आम्ही एकत्र आलो, एकत्र जाणार आहोत. मुंबईच काय महाराष्ट्र ताब्यात घेणार आहोत. म्हणजे त्यांना सत्तेचं पडलं आहे. उद्या राज ठाकरे सोबत राहिले नाहीत तर त्यांना दोष द्यायचा. मी मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी हाक घातली पण त्यांनी दाद दिली नाही, असं म्हणायचं. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा युज अँड थ्रो केला. राज ठाकरे शांत होते, निवडणुकीच्या काळात त्यांना वापर करुन बाहेर काढलं"
दरम्यान, जर-तरला राजकारणात काही अर्थ नाही. त्यामुळं हे दोघेही एकत्र आले तरी त्याचा काही फरक पडणार नाही. महाराष्ट्रातला मराठी माणूस कुठल्या एका पक्षाला मतदान करत नाही. तुम्ही महापालिका किंवा विधानसभेच्या निवडणुका पाहा. त्यात राज्यात जे मतदान झालं त्यात मोठा जनाधार महायुतीला मिळाला. त्यामुळं स्वार्थासाठी मराठी माणूस यांना आठवला आहे. वीस वर्षे राज ठाकरे यांच्याकडं त्यांना बघण्याची उसंत नव्हती.
पण आता राज ठाकरेंना त्यांना सन्माननीय बोलावं लागलं. तेव्हा खऱ्या अर्थानं सन्मान करण्याची गरज होती. पण त्यावेळी राज ठाकरेंनी मोठं मन दाखवून महाबळेश्वरला जे अधिवेशन झालं त्यात कार्यकारी अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंना नेमा हे मोठ्या मनानं राज ठाकरेंनी सांगितंल. पण जेव्हा राज ठाकरेंना सन्मान देण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्या समर्थकांना एक तिकीट सुद्धा उद्धव ठाकरेंनी दिलं नाही. त्यामुळं आता आलेलं प्रेम किंवा सन्मान हे पुतणा मावशीचं प्रेम असल्याचं दिसून येतं"
भाषणात काही राजकीय विचार दिला असता, मराठी माणसाच्या हितासाठी काही गोष्टी कशा करणार आहोत याचा काही अॅक्शन प्लॅन दिला असता तर मराठी माणसाला आनंद झाला असता. यात फडणवीसांच्या बाबत केवळ काविळ झाल्याचं दिसून आलं. मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या तर मुंबईला तोडण्याच्या गोष्टी सुरु होतात. हे नाटक आता मराठी माणसाला आणि मुंबईकरांना नीट समजतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.