Sushil Kedia: मनसेच्या हिसक्यानंतर सुशील केडियांची जिरली! राज ठाकरे अन् मराठी भाषेसंबंधी विधानाबद्दल मागितली जाहीर माफी

Sushil Kedia: या व्यापाऱ्यानं मराठी हिंदींच्या वादात उडी घेत सोशल मीडियावर एक पोस्ट करुन ती थेट राज ठाकरेंना टॅग केली होती.
Sushil Kedia
Sushil Kedia
Published on
Updated on

Sushil Kedia : मुंबईतील गुजराती व्यापारी असलेल्या सुशील केडिया यांनी काल मराठीच्या मुद्द्यावरुन एक चिथावणीखोर विधान केलं होतं. मी ३० वर्षे महाराष्ट्रात राहतो, मराठी बोलणार नाही, बोला काय करणार? अशा शब्दांत थेट राज ठाकरेंना आव्हान दिलं होतं. पण आज त्यानं आपले शब्द मागे घेत जाहीर माफी मागितली आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत केडिया यांनी हा वाद आता संपवा अशी राज ठाकरेंना विनंतीही केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी केडिया यांच्या कार्यालयावर नारळफेक कर तोडफोड केली. त्यानंतर केडियांनी माघार घेतली आहे.

Sushil Kedia
Raj Thackeray : सुरेश जैनांचे नाव ऐकताच बाळासाहेब म्हणाले, ‘...त्यांना जाऊन सांग, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल’ : राज ठाकरेंनी सांगितला 1999 चा प्रसंग

केडियांनी माघार घेताना काय म्हटलं?

केडियांनी व्हिडिओत म्हटलं की, माझे मागचे ट्विट जर तुम्ही पाहिले तर त्यात मी राज ठाकरेंचं कौतुक केलं आहे. मला आशा आहे की त्यांना याची माहिती असेल. जेव्हा आपले आपल्या लोकांचा श्वासाची कोंडी करु लागतात तेव्हा चुका या चारही बाजूनं होत असतात. माझी चूक मी मान्य करतो, क्षमेची याचना करतो. तसंच आशा करतो की ज्यांच्या हातात आहे की हे वातावरण चांगलं करावं. तसंच सर्वांच्या हृदयात हा धीटपणा यावा की मराठी भाषेला आपण सर्वाधिक सुरळीपणे आपलंस करु शकू. तर मी आपला आभारी असेन.

Sushil Kedia
Shivsena-MNS Alliance: अखेर तो क्षण आलाच! शिवसेना-मनसे युतीची उद्धव ठाकरेंकडून घोषणा; म्हणाले, एकत्र आलोय...

काय केलं होतं वादग्रस्त विधान?

सुशील केडीया यांनी गुरुवारी संध्याकाळी ट्विटरवर इंग्रजीत एक पोस्ट केली. यामध्ये त्यांनी सुरुवातीलाच म्हटलं की, राज ठाकरेंनी याची नोंद घ्यावी. पुढे ते लिहितात, "मी गेल्या ३० वर्षांपासून मुंबईत राहतो तरी देखील मला मराठी व्यवस्थित येत नाही. पण हिंदी भाषिकांना तुम्ही देत असलेल्या वाईट वागणुकीमुळं मी आता असा निश्चिय केला आहे की, जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांच्या काळजीचं नाटक करण्याची परवानगी मिळत राहील तोपर्यंत मी प्रतिज्ञा करतो की, मी मराठी बोलणार नाही, काय करणार बोला?"

Sushil Kedia
Raj Thackeray : सुरेश जैनांचे नाव ऐकताच बाळासाहेब म्हणाले, ‘...त्यांना जाऊन सांग, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल’ : राज ठाकरेंनी सांगितला 1999 चा प्रसंग

दरम्यान, या पोस्टनंतर पुन्हा एकदा सुशील केडियांनी ट्विट करत आपल्याला धमक्या येत असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांना टॅग करत त्यांनी आपल्याला सुरक्षा देण्यात यावी अशीही मागणी केली आहे. पण या प्रकारानंतर राज ठाकरे किंवा मनसेची यावर अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मनसे यावर कशा प्रकारे व्यक्त होते हे पाहावं लागणार आहे.

Sushil Kedia
Raj-Uddhav Thackeray Alliance : राज-उद्धव ठाकरे एका मंचावर आले, भाजप आमदाराने पहिला वार केला; म्हणाले, 'मराठी नाही...'

कोण आहे सुशील केडिया?

सुशील केडिया हे शेअर बाजाराच्या व्यवसायात काम करत आहे. केडियानॉमिक्स नावाची त्यांची कंपनी असून या कंपनीचे ते संस्थापक आणि सीईओ आहेत. शेअर बाजारात ट्रेडिंगचा या कंपनीचा व्यावसाय आहे. सेबीकडंही ही कंपनी रजिस्टर असल्याचं सुशील केडियाच्या सोशल मीडियावरील प्रोफाईलवरुन कळतंय. सुशील केडिया हे अनेकदा अर्थविषयक वृत्तवाहिन्यांवर शेअर मार्केटसंदर्भातील ट्रेंड विषयी तज्ज्ञ म्हणून बोलावले जात असतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com