Raj Thackeray Speech : राज ठाकरेंनी फिरवला अजितदादांच्या 'त्या' स्टाइलवर शाब्दिक रोलर..

Raj Thackeray On NCP-BJP : पत्रकारांच्या प्रश्‍नावरील अजितदादांचा खुलासा यावरून राज यांनी अजितदादांना फैलावरच घेतले.
Raj Thackeray Speech
Raj Thackeray SpeechSarkarnama
Published on: 
Updated on: 

Panvel News : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी खड्ड्यांच्या मुद्दा हातात घेतानाच भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाकडे वळून, राज यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर एकप्रकारे ‘शाब्दिक’ रोलर’च फिरवला. भाजपसोबत सत्तेत जाण्याचे कारण, पुण्यातील बैठक आटोपून गाडीतून परततानाचा अजितदादांचा ‘व्हायरल व्हिडिओ’, त्यावरच्या पत्रकारांच्या प्रश्‍नावरील अजितदादांचा खुलासा, यावरून राज यांनी अजितदादांना फैलावरच घेतले. त्याचवेळी डोक्यावर बंदुका ठेवून आमदारांना आपल्याकडे घेता, असा टोेला लागावून राज यांनी भाजपलाही झोडपले. (Latest Marathi News)

Raj Thackeray Speech
Raj Thackeray Secret Blast : भाजपच्या ऑफरबाबत राज ठाकरे प्रथमच बोलले; ‘पण मी अजून निर्णय घेतलेला नाही...’

राज यांनी पनवेलमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उपस्थित राहून रस्ते, त्यावरचे खड्डे आणि त्याकरिताचे आंदोलन यावर त्यांनी भूमिका मांडली. राज यांच्या भाषणात पहिलाच मुद्दा रस्त्यांचा राहिला. त्यावरून राजकीय फोडाफोडीला हात घातला. त्यात, अजितदादादांना ओढले आणि थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार-अजित पवारांच्या भेटीचा मुद्दा उकरून काढला. गाडी लपवल्याचा आणि त्यावरचा अजितदादांचा खुलासाही राज यांनी आपल्या स्टाईलमध्ये बोलून दाखविला. तेव्हा पुन्हा एकदा राज यांनी अजितदादांची मिमिक्री केली.सत्तेत सहभागी होण्याबाबतचे अजितदादांनी मांडलेले कारण पुढे करून राज यांनी त्यांची खिल्ली उडवली.

Raj Thackeray Speech
Bawankule On Amit Thackeray: अमित ठाकरेंनी टोल नाक्यावर आंदोलन करायला हवं होतं; बावनकुळेंनी 'मनसे'ला पुन्हा डिवचलं

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पनवेल इथे निर्धार मेळावा पार पडत आहे. यावेळी अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. "मी काही इथे भाषण करायला आलो नाही, फक्त हिरवा झेंडा दाखवायला आलो आहे, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आंदोलनकर्त्यांना चार्ज केलं आहे. आज पनवेलमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.