

Regional Party Income: प्रादेशिक स्तरावरील ३६ राजकीय पक्षांच्या एकत्रित उत्पन्नात २०२४-२५ या आर्थिक वर्षात मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ५१ टक्क्यांहून अधिक घट झाली असून, त्यापैकी २१ पक्षांनी जाहीर केलेल्या उत्पन्नापेक्षा अधिक खर्च केल्याचे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) अहवालात म्हटले आहे. बुधवारी (ता. २७) प्रसिद्ध झालेल्या या अहवालात निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ६७ मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षांपैकी ३६ पक्षांच्या २०२४-२५ आर्थिक वर्षातील लेखापरीक्षित हिशेबांचे विश्लेषण करण्यात आले आहे. अहवालानुसार, उर्वरित ३१ पक्षांनी ३१ ऑक्टोबर २०२५ या अंतिम मुदतीनंतर तब्बल २०७ दिवस उलटूनही आपले लेखापरीक्षण अहवाल उपलब्ध करून दिले नव्हते.
२०२३-२४ : २,४६३.१७ कोटी रुपये
२०२४-२५ : १,१९२.९४ कोटी रुपये
घट : १,२७०.२३ कोटी रुपये (५१.५७% टक्के)
२०२४-२५ : सर्वांचा मिळून एकूण खर्च १,४३३.०७ कोटी रुपये (अतिरिक्त खर्च २४०.१२ कोटी रुपये)
तेलुगू देसम : २२८.३१ कोटी रुपये
तृणमूल काँग्रस : २१९.३५ कोटी रुपये
वायएसआर काँग्रेस : १४०.३९ कोटी रुपये
वायएसआर काँग्रेस : ३४०.२० कोटी रुपये
बिजू जनता दल : २८८.४४ कोटी रुपये
तृणमूल काँग्रेस : २२७.५९ कोटी रुपये
वायएसआर काँग्रेस : १९९.८२ कोटी रुपये अधिक
अतिरिक्त खर्चाचे प्रमाण : १४२.३३%
तेलुगू देसम : १६६.९८ कोटी रुपये
मनसे : ३६.२७ कोटी रुपये
अण्णा द्रमुक : ३५.८६ कोटी रुपये
एकूण देणग्या : ७०२.३६ कोटी रुपये
एकूण उत्पन्नातील वाटा : ५८.८८%
तृणमूल काँग्रेस : १८४.०८ कोटी रुपये
वायएसआर काँग्रेस : १४०.०५ कोटी रुपये
तेलुगू देसम : ८५.२० कोटी रुपये
वेळेत अहवाल सादर करणारे पक्ष : १५
उशिरा सादर करणारे पक्ष : २१
अहवाल न अपलोड करणारे पक्ष : ३१
विलंब कालावधी : २ ते ९६ दिवस
अंतिम मुदतीनंतर उलटलेले दिवस : २०७
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.