Aditya Thackeray and Sandip Deshpande : संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना इशारा; म्हणाले, "वरळी कुणाच्या..."

Vinayak Raut : विनायक राऊत गल्लीतून चुकून दिल्लीत गेलेले नेते
Aditya Thackeray, Sandip Deshpande
Aditya Thackeray, Sandip DeshpandeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Thackeray Group vs MNS : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी जळगाव येथे टीका केली होती. राज ठाकरे हे भाजपचे पोपट असल्याच वक्तव्य राऊत यांनी केले होते. त्यावर राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उंदीर असल्याचा पलटवारही मनसेकडून करण्यात आला होता.

दरम्यान, खासदार विनायक राऊत यांनीही राज ठाकरे यांच्या रत्नागिरीतील सभेवरून खोचक टोला लगावला आहे. त्या टीकेचा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. तसेच वरळी मतदारसंघावरून आदित्य ठाकरे यांनाही इशारा दिला. ठाकरे गट आणि मनसेच्या आरोप-प्रत्यारोपांवरून राज्याचे राजकारण तापल्याचे दिसून येत आहे.

Aditya Thackeray, Sandip Deshpande
Nana Patole on Ajit Pawar: अजित पवार मुख्यमंत्री होणार? आता नाना पटोलेही म्हणाले, मोदी है तो मुमकीन हैं

वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeary) आहेत. आता या मतदारसंघातून मनसे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून संदीप देशपांडे यांच्या वरळीतील फेऱ्या वाढल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, वरळी येथील मनसेच्या वतीने काही सभांचे आयोजन केल्याची माहितीही देशपांडे यांनी दिली आहे. ते म्हणाले, "MNS मनसेतर्फे म्हाडा येथील बीडीडी चाळीत कोकणवासियांची बैठक होणार आहे. तर सिडकोचीही बैठक आयोजित करण्यात आले आहे. वरळी हा मतदारसंघ कुणाच्या बापाचा नाही. हा मतदारसंघ जनतेचा आहे. तेथे जनता ठरवेल कुणाला निवडून द्यायचे ते."

Aditya Thackeray, Sandip Deshpande
WFI President Brij Bhushan Singh: भाजप खासदार, WFI चे अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्या विरोधात सात कुस्तीपटुंची न्यायालयात धाव

दरम्यान राज ठाकरे यांची ६ मे रोजी कोकणातील खेड येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेची मनसेकडून तयारी सुरू आहे. त्या सभेवरून खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. विनायक राऊत म्हणाले, "मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची रत्नागिरीतील सभा म्हणजे पिकनिक आहे. राज ठाकरे यांनी रत्नागिरीत येऊन पिकनिक करावी आणि निघून जावे." त्यानंतर आज मनसेचे देशपांडे यांनी राऊतांना चुकून दिलेला गेलेले नेते अशी टीका केली आहे.

रत्नागिरीतील सभेवरून विनायक राऊतांनी राज ठाकरेंवर टीक केली होती. त्याचाही देशपांडे यांनी समाचार घेतला. संदीप देशपांडे म्हणाले, "विनायक राऊत हे गल्लीतील नेते आहे. ते चुकून दिल्लीचे नेते झाले आहे. त्यामुळे गल्लीतील नेत्यांनी राज ठाकरेंवर बोलू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे फोटो लावून निवडून आलेल्यांना कुणावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांना येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत कळेल त्यांची लायकी. आम्ही कुणाचे फोटो लावून निवडून आलेलो नाही." यानंतर देशापांडे आता लोक उद्धव ठाकरे यांच्या सभेला कंटाळले असल्याचेही म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.