

Mumbai News : राज्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच एक गौप्यस्फोट केला होता. त्याला ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी प्रत्युत्तर दिले आहे. बावनकुळे यांची राऊतांनी खिल्ली उठवली आहे. बावनकुळेंच्या या वक्तव्यावरून राऊतांनी सडकून टीका केली आहे.
"चंद्रशेखर बावनकुळे हे सदगृहस्थ आहेत. चंद्रशेखर बावनकुळेंना महाराष्ट्राचे राजकारण समजत नाही. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेऊ नये," असे राऊत म्हणाले. शिवसेना (उद्वव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिबिर आज वरळीत सुरु आहे. यावेळी माध्यमांशी ते बोलत होते.
काय म्हणाले होते बावनकुळे..
"उद्धव ठाकरे हे लवकरच मुख्यमंत्रीपद सोडणार होते. सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्लॅन होता.आधी अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचे ठरले होते. पण अचानक सुप्रिया सुळे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी आले, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. हा अजेंडा राष्ट्रवादीचा असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले होते.
शिवसेनेचा 57व्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा आमने-सामने येत आहेत. उद्या (सोमवारी)ठाकरे गट व शिंदे गट जल्लोषात वर्धापन दिन साजरा करत आहे. शिंदे गटाचा वर्धापन दिन गोरेगाव येथे होत आहे. या निमित्ताने मुंबईत ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. यावरुन राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
खरे वाघ हे उद्धव ठाकरेंसोबत
"आज मी रस्त्यांवर लागलेले शिंदे गटाचे पोस्टर्स पाहिले. त्यात लिहिले आहे की, वाघ निघाले गोरेगावला. हे कसले वाघ आहेत. हे तर वाघाचे कातडे पांघरलेले लांडगे आहेत. खरे वाघ हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत आणि या वाघांना उद्धव ठाकरे उद्या मार्गदर्शन करतील," असे राऊत म्हणाले.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.