Shivsena Dasara Melava: "जो अन्यायाविरुद्ध पेटून उठत नाही, त्यानं शिवरायांचं नाव घेऊ नये"; उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात कडाडले

Shivsena Dasara Melava: शिवाजी पार्क पार पडलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आज उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील आणि राज्यातील सरकारांवर चौफेर फटकेबाजी केली.
Uddhav Thackeray at Dasara Melav
Uddhav Thackeray at Dasara Melav
Published on: 
Updated on: 

Shivsena Dasara Melava: शिवाजी पार्क पार पडलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आज उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील आणि राज्यातील सरकारांवर चौफेर फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी देशातील सरकार बदलणार असल्याचं सांगितलं. तसंच ज्ञानेश कुमार यांच्यावर सडकून टीका केली, तसंच जेनझींचं आंदोलन आणि भीमनवार यांचा उल्लेख करत टीका केली. त्याचबरोबर जो अन्यायाविरुद्ध चिडून पेटून उठत नाही, त्यानं शिवरायांचं नाव घेऊ नये, असं आवाहन केलं.

ठाकरे म्हणाले, "शिवरायांच्या महाराष्ट्राला शहरी नक्षलवादाचं केंद्र म्हणताना तुमची जीभ कशी जड होत नाही. मला नाही वाटत देशात कुठल्या राज्यात इतके क्रांतीकारक झाले असतील तितके महाराष्ट्रात झाले आहेत. साधू, संत, इतिहासकार, लेखक, रंगभूमी तुम्ही सांगा या परंपरेला कलंक या राज्याचा प्रमुख मुख्यमंत्री करतो. ही जी मुलं सगळी रस्त्यावर येतात कशासाठी येतात? मोदींनी जो मुहूर्त काढला होता तो म्हणजे अभिजीत. मग बरोबर ठरला तो, बसला ना दिपके त्यांच्या डोक्यावर"

Uddhav Thackeray at Dasara Melav
Sanjay Raut: संजय राऊतांनी 'रिजीम' बदलण्याचा केला पुनरुच्चार; "PM मोदी पायउतार होणार", या भाकितासह थेट तारीखचं सांगितली

जिथं आमची लोकशाही आमची मतं लुटायचं काम सुरु आहे तिथं आणखी काय लुटायचं बाकी राहील आहे. सगळं लुटून झाल्यानंतर आता दादही मागायची नाही? सगळ्या संस्था मग त्यात न्यायालये आली, सरकार आलं, पोलीस, नोकरशा, मुख्यमंत्री आले या सगळ्यांचे दरवाजे ठोठावून झाल्यानंतर जर कोणी दाद देत नसेल तर मग चिडून कोणी रस्त्यावर उतरलं तर मग त्याला नक्षलवादी म्हणायचं? असाही घणाघात ठाकरेंनी यावेळी केला.

...तर शिवरायांचं नाव घेऊ नका - ठाकरे

"जेव्हा दिल्लीला जंतर-मंतरला जेनझी जेव्हा रस्त्यावर उतरले तेव्हा तुमचे पोलीस त्यांच्यावर लांडग्यासारखे तुटून पडले. पोलीस कोणाच्ये झिंज्या ओढताहेत, कपडे फाडतंय आणि मोहन भागवत आंदोलनाची सभ्यता शिकवत आहेत. साधी साधी मुलं पहिल्यांदा नीटचा पेपर फुटला म्हणून रस्त्यावर उतरली. त्यावेळी त्यांनी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला. आता सुद्धा जर मतचोरी होत आहेत तर माझं मत जर चोरी होत असेल तरी देखील मी षंढा सारखं गप्पच बसूनच राहायचं का? आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं? जो अन्यायाविरुद्ध चिडून पेटून उठत नाही त्यानं शिवरायांचं नाव घेऊ नये" अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी जनतेला आवाहन केलं.

Uddhav Thackeray at Dasara Melav
Namo Yojana: ९२ लाख शेतकऱ्यांचे ४ हजार रुपये रखडले! नमो योजनेच्या निधीबाबत सरकारचा निर्णय कधी?

बांगलादेशी, ज्ञानेश कुमार अन् भीमनवार

आपल्या देशात १३ नागरिकांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला, १३ कोटी हा साधा आकडा आहे का? हे म्हणजे आपल्या महाराष्ट्राची पूर्ण लोकसंख्या. एवढी लोकसंख्या तुम्ही मतदानाच्या नकाशातून काढून टाकता. बरं तुम्ही काढलं जरी तुम्ही आधी म्हटला होता की, बांगलादेशींनी या देशात राहण्याचा अधिकार नाही. मग हे १३ कोटी लोक बांगलादेशी आहेत का? जर हे लोक वंदे मातरम म्हणणारे असतील तर त्यांनी ते का म्हणावं? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा यांनी घेतला दुसरीकडं भीमनवार यांना त्यांनी रजेवर पाठवलं. पण ज्ञानेश कुमारांचा राजीनामा अजून का घेतला नाही. याचं कारण स्वच्छ आहे की, रावणाप्रमाणं ज्ञानेश कुमार हे या सरकारची बेंबी आहेत. त्यामुळं याच्या रक्षणासाठी ते पोलीस फाटा लावत आहेत. जर तुम्ही त्यांच्याविरोधात काही बोललात तर तुमच्यावर दंडुका चालणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com