Shiv Sena : सोळा आमदार अपात्र ठरण्याची शक्यता.. ; कोर्टाच्या निर्णयाआधी आयोगाचा निर्णय नको !

Uddhav Thackeray News : आता घटनेनुसार पक्षप्रमुख पदाची निवडणूक घेण्यास निवडणूक आयोगाने मान्यता द्यावी," असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
Uddhav Thackeray Latest Marathi
Uddhav Thackeray Latest Marathi Sarkarnama

Uddhav Thackeray News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत शिंदे गटावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. निवडणूक आयोगाकडे आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. "सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्याशिवाय निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

"पक्ष हा दोन पातळीवर असतो. एक हा वैधानिक पातळीवर असतो, तर दुसरा हा रस्त्यावर असतो. दुसऱ्या गटाला मी शिवसेना मानत नाही, शिवसेना एकच राहणार, शिंदे गटाला मी शिवसेना मानत नाही," असे ठाकरे म्हणाले. "सोळा आमदार हे अपात्र ठरण्याची शक्यता असल्याने निवडणूक आयोगाने न्यायालयाच्या पूर्वी निकाल देऊ नये," असे ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray Latest Marathi
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या आरोपांवर नरेंद्र मोदी काय प्रत्युत्तर देणार ?..

शिवसेना पक्षप्रमुख पदाची निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने घेऊ द्यावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगाची मागितलेली माहिती आम्ही त्यांना दिली आहे,असे ते म्हणाले.

Uddhav Thackeray Latest Marathi
Kasaba By Election : 'उमेदवारी अर्ज मागे घ्या, अन्यथा..' ; कसब्यातील उमेदवाराला धमकी

"केवळ निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नसतो. यासंदर्भात लाखो सदस्यांचे प्रतिज्ञापत्र आम्ही निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत. शिवसेनेची एक घटना आहे. त्या घटनेवर पक्ष चालतो. त्यामुळे आता घटनेनुसार पक्षप्रमुख पदाची निवडणूक घेण्यास निवडणूक आयोगाने मान्यता द्यावी," असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

"गद्दारांनी शिवसेनेवर केलेला दावा हा विकृतपणाचा, नीचपणाचा आहे," असे ठाकरेंना यांनी शिंदे गटाला सुनावलयं. "शिंदे गटालाच घटनाच नाही, शिंदे गटाचं 'मुख्यनेता' हे पद शिवसेनेत नाही," असे ठाकरे यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com